नारायण राणे यांच्या मालवण चिवला बीचवरील ‘निलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश, राणे-शिवसेना संघर्ष वाढणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नारायण राणे यांच्या मालवण चिवला बीचवरील 'निलरत्न' बंगल्यावर कारवाईचे आदेश, राणे-शिवसेना संघर्ष वाढणार?
भाजप नेते नारायण राणे
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:41 PM

मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद पुन्हा तापला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. यानंतर शिवेसना आणि नारायण राणे यांच्या पुन्हा वाद पेटण्यास सुरुवात झाली. राणेंच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यादरम्यान मुंबई महापालिकेनं (BMC) नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी नोटीस दिली. मुंबई महापालिकेचे अधिकारी राणेंच्या घरी पोहोचले देखील होते. मात्र, जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यानं ते पाहणी न निघून गेले होते. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. याला उत्तर देण्यासाठी पुन्हा शिवसेनेनं मुंबईतील अविघ्न इमारतीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर नीलरत्न बंगल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. चिवला बीचवरील त्याच बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला भारत सरकारच्या एका संस्थेकडून देण्यात आले आहेत.

निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष वाढणार

काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोन अनधिकृत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ॲागस्ट 2021 ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी पत्र काल पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार असल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे आता शिवसेनेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

इतर बातम्या:

भगवदगीतेच्या पठणाला विरोध दुर्दैवी, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून परवानगी द्या, नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

चर्चा तर होणारचः लोढा-राज यांच्या भेटीचे गुपित काय; मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोस्ताना होणार का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.