ठाकरे गटात बंद दाराआड हालचाली, ठाकरेंच्या 288 संपर्कप्रमुखांना मोलाच्या सूचना, राजकारणात नव्या घडामोडींची नांदी?

लोकसभेनंतर आता पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलंय. असं असलं तरीही उद्धव ठाकरे विधानसभेत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत.

ठाकरे गटात बंद दाराआड हालचाली, ठाकरेंच्या 288 संपर्कप्रमुखांना मोलाच्या सूचना, राजकारणात नव्या घडामोडींची नांदी?
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 10:10 PM

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून आता राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी केली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि भाजपची युती तुटून आधी महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. हे सरकार अडीच वर्षांनी कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात पुकारलेलं बंड हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलं. यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाला. यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश आलं. याच यशानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा कामाला लागले आहेत.

लोकसभेनंतर आता पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलंय. असं असलं तरीही उद्धव ठाकरे विधानसभेत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते आतापासूनच प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक जागांवर यश मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी आज राज्यातील प्रत्येक मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व संपर्कप्रमुखांना मोलाच्या सूचना केल्या.

उद्धव ठाकरे यांनी नेमक्या काय सूचना केल्या?

उद्धव ठाकरे यांनी आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. यामध्ये प्रामुख्याने विधानसभानिहाय विधानसभा संपर्कप्रमुखांकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. आठवडाभरात या सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांना आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामध्ये विधानसभानिहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात विधानसभेमध्ये मिळालेला मताधिक्य या सगळ्यांचा अहवाल विधानसभा संपर्कप्रमुख यांना आठवड्याभरात सादर करायचा आहे.

‘शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवून द्या’, ठाकरेंची सूचना

महाविकास आघाडीमध्ये ज्या-ज्या विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल. महाविकास आघाडीमध्ये जरी निवडणूक लढवली जाणार असली तरी 288 जागांची तयारी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानसभा संपर्कप्रमुखांना केले आहेत. 25 वर्षांपूर्वीची जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना आता भाजप आणि विरोधकांना दाखवा आणि विधानसभेच्या तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.