अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात आखली जाणार विशेष रणनिती

आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात आखली जाणार विशेष रणनिती
अमित शाह
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 9:17 AM

Maharashtra Vidhansabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमित शाह यांचे मुंबईत स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईत झळकताना दिसत आहेत. अमित शाह यांनी आज दुपारी 1.30 वाजता मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबईतही बैठक

अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील बैठकीनंतर अमित शाह हे संध्याकाळी 4.30 च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील.

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांबद्दल सह्याद्रीवर खलबतं

या दोन्हीही बैठकींनंतर आज रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला स्वत: अमित शाह उपस्थितीत असणार आहे. यावेळी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी अमित शाह हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे.

पहिली यादी नवरात्रीत येणार?

दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांकडून 80 टक्के जागा वाटपावर एकमत झाले आहे. यानुसार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 125 ते 140 जागा लढवणार आहे. तर शिंदे गट 70 ते 75 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. कमी जागा लढवून त्या जिंकून स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आणि सत्तेत प्रमुख पदावर दावा करायचा, असा मानस शिवसेनेने केला आहे. येत्या नवरात्रीत महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.