कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत, मुंबईचा किंग कोण ठरणार? दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील ३६ मतदारसंघांवर विशेष लक्ष पाहायला मिळत आहे. या लेखात मुख्य उमेदवारांच्या लढती आणि त्यांच्या राजकीय गणिताचा आढावा घेतला आहे.

कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत, मुंबईचा किंग कोण ठरणार? दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
मुंबई विधानसभा मतदारसंघांचा आढावा
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 10:46 AM

Mumbai Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु होताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

मुंबईतील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 420 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीने मुंबईतील 36 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे 22, काँग्रेस 11 आणि शरद पवार गट 2 तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीकडून भाजप 18, शिंदे गट 16 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार रिंगणात आहेत.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 25 उमेदवार दिले आहेत. यामुळे मराठी मतदारांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकासाआघाडी या दोघांचे आव्हान वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी सर्वाधिक जागा महायुती जिंकेल, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी आपल्या मित्रपक्षांना कमकुवत करते. मात्र माझ्या पक्षाने मित्रपक्षांना बळ दिले आहे, असे अनिल परब यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील हायव्होल्टेज लढत

वरळी : वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. तर मनसेकडून संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटातून मिलिंद देवरा हे रिंगणात उतरले आहेत. यामुळे वरळीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरेंनी याच मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते.

माहीम : माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही लढत सर्वात प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण माहीममधून मनसेने त्यांचे पुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. त्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाने महेश सावंत यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे आता यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

वांद्रे पूर्व : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. तर शिवसेना ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना मैदानात उतरवले आहे. तर मनसेने माजी आमदार तृप्ती सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी कुणाल सरमळकर यांनीही या मतदारसंघातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

मानखुर्द : मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून जामिनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक हे रिंगणात उतरले आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाने या मतदारसंघातून सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकासाआघाडीने या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना तिकीट दिले आहे. यामुळे मानखुर्द विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

शिवडी : दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून शिवडी विधानसभेकडे पाहिले जाते. शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकड़ून विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लालबागचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांच्यात वाद निर्माण झाला होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना तिकीट दिले आहे. तर मनसेने ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर येथून निवडणूक लढवत आहे. तसेच शिंदे गटाचे नेते नाना आंबोले यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे शिवडीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.