शिंदे-फडणवीस यांच्या बैठकीतील Inside Story, अमित ठाकरे यांच्याबद्दल काय निर्णय ठरला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 'वर्षा' बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीवेळी सदा सरवणकर यांना बोलावण्यात आलं. यानंतर सदा सरवणकर तिथे आले. यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. पण सदा सरवणकर उमेदवारी मागे घेण्यास तयार नाहीत.
“मनसेसाठी माघार नाही”, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. यानंतर आमदार सदा सरवणकर हे देखील तिथे आले. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सदा सरवणकर यांच्या चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. ते अनेक वर्षांपासून इथे निवडून येत आहेत. पण यावेळी मनसे पक्षाकडून पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेसाठी ही जागा महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे युती धर्म पाळावा यासाठी सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा भाजपचा आग्रह आहे. पण सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीवेळी सदा सरवणकर यांना बोलावण्यात आलं. यानंतर सदा सरवणकर तिथे आले. सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना केल्याची माहिती आहे. पण सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट भूमिका मांडली. मी उठावावेळी तुमच्यासोबत होतो. मी सुद्धा कबड्डीचा खेळाडू आहे. त्यामुळे मी मैदानातून हटणार नाही, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट म्हटलं. त्यामुळे नेमकं काय घडणार? याचा सस्पेन्स वाढला आहे.
गीता जैन यांच्या उमेदवारीबाबतही चर्चा
दुसरीकडे मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन या अपक्ष असल्या तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. शिंदेंनी शिवसेनेत बंड पुकारलं तेव्हा त्यांनी त्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यामुळे गीता जैन यांनादेखील चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आलं होतं. गेल्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मेहता हे उमेदवार होते. यावेळी त्यांच्याऐवजी आपल्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी गीता जैन यांची मागणी आहे. त्यांनादेखील वर्षा येथील बैठकीनंतर वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यात सकारात्मक चर्चा, 8 ते 9 जागांचा तिढा सुटला
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांच्या आजच्या बैठकीत 8 ते 9 जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता फक्त दोन ते तीन जागांचा तिढा असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर मीरा-भाईंदरच्या जागेबाबत उद्या निर्णय घेतला जाऊ शकतो.