Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार

दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केलीय. Mansukh Hiren Death Case

Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 7:25 PM

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसनं गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केलीय. हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या परिसरात एटीएसकडून पुन्हा एकदा तपास केला जाणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra ATS register case in Mansukh Hiren death Case under 302 on complaint of Vimla Hiren)

विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद

गृह विभाग,महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांचेकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे.त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार गु. र. क्र. 12/2021 भा.द.वि. कलम 302,201,34,120 B प्रमाणे विमला मनसुख हिरेन यांचे फिर्यादीवरून दहशतवाद विरोधी पथक पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांच्या फोनचं लास्ट लोकेशन वसई

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील एक गूढ संपत नाही तोच दुसरं गूढ निर्माण होत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिरेन यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन्स वसई गावात होते. त्यामुळे हिरेन ठाण्यावरून वसईत कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. नुकतंच गृहमंत्रालयाकडून याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं आहे. पण क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तपास गुन्हा एनआयएकडे दिला जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. यामुळे आता एनआयएकडेच तपासासाठी कागदपत्रे देण्यात तयारी करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?

मनसुख हिरेन यांच्या डोळ्यावर, पाठीवर जखमा, मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता

(Maharashtra ATS register case in Mansukh Hiren death Case under 302 on complaint of Vimla Hiren)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.