महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
यवतमाळ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या समाधी स्थळावर कोसळली वीज
वीज कोसळल्याने समाधीस्थळाला पोहचली क्षती
काल रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यासह परिसरात वीज कोसळली
वीज पडल्याने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळाचे नुकसान
गहुली येथे आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांची समाधी
समाधीस्थळाच्या छताचे व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नातू भाजपा आमदार निलय नाईक यांच्यासह तहसीलदार पुसद यांनी आज केली समाधी स्थळाची पाहणी
नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील फॉरच्यून मॉलच्या पार्किंगमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मृतदेह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाचा असल्याची माहिती
अभिषेक बघेल असे मृत तरुणाचे नाव
नागपुरात लॉकडाऊन असल्याने मॉलच्या पार्किंगमध्ये कुठलीही वर्दळ नाही
तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही
कोल्हापूर महामार्ग रोको करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफीच्या मागणीसाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनाचे आंदोलन
तब्बल दीड तासाहून अधिक काळ रोखला पुणे बेंगलोर महामार्ग
राजू शेट्टींना कडून सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम
राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे, लॉकडाऊनचा पर्याय दिसतो आहे. पण लोक मास्क घालत आहे. विदेशी स्ट्रेन हा आला होता. पण तो कंट्रोल आला आहे. हा कोणताही नवीन प्रकार नाही : मुख्यमंत्री
स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घ्यावी, यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली आहेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सचिन वाझे, मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती, दिल्लीत शरद पवार आणि अनिल देशमुख यांची दीड तास बैठक
सोलापुरात गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालयावरील निर्बंध कडक होणार
मंगल कार्यालयाबरोबर आता वऱ्हाडी लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार
शिवाय ज्या मंगलकार्यालयात गर्दी होते ते मंगल कार्यलये तात्काळ सील करण्याचे आदेश
सोलापुर जिल्ह्यात सध्या 1742 कोरोनाचे सक्रिय रुग्ण
येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखीन कडक निर्बंध लावण्यात येणार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
औरंगाबादच्या सिल्लोड नगरपरिषदेत जोरदार राडा
शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यातील नगरपरिषदेत राडा
सफाई कामगारांचे पगार थकवल्यामुळे झाला राडा
सफाई कामगार, भाजप कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात राडा
सफाई कामगारांच्या पगारासाठी यापूर्वी झाले होते शोले स्टाईल आंदोलन
आंदोलन करूनही पगार न मिळाल्यामुळे राडा
अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली
दिल्लीत शरद पवार यांच्या घरी भेट
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु…
महाराष्ट्र सरकार आपली बाजू मांडत आहे…
मुकुल रोहतगी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भूमिका मांडत आहेत…
ओबीसी आरक्षण केस कडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं
आमच्या सरकार मध्ये आम्ही ते टिकवून नेलं होत
या सरकारने ओबीसी समाजावर मोठा अन्याय केला आहे
सरकारने आता तरी तातडीने सुप्रीम कोर्ट त जाऊन वेळ मागितली पाहिजे
गाव पातळीवर डाटा तयार करायला पाहिजे. आयोग तयार करायला पाहिजे
या सरकार ला मराठा आरक्षणकडे दुर्लक्ष केलं. आता ओबीसीवर अन्याय
या सरकार विरोधात आम्ही आता पेटून उठलो आहे, लवकरच आंदोलन करणार आहोत
सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होवँक्स लसीच्या चाचणीला पुढील महिन्यात होणार सुरुवात
लसीच्या 20 कोटी डोसचं सिरमनं केलं नियोजन
एप्रिल महिन्यात लसीच्या मानवी चाचण्यांना सुरुवात होणार आहे
तर जून महिन्यात लसीचं प्रत्यक्ष वितरण होण्याची सिरमला अपेक्षा आहे
अमेरिकन कंपनी नोव्हावँक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट मिळून बनवतायेत कोव्होवँक्स ही लस
भारतात लसीच्या चाचण्या करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आल्याची आदर पुनावालांची माहिती
ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचणीत कोव्हावँक्स लसीच्या परिणामकारकता ही 89.3 टक्के असल्याचं सिरमनं म्हटलंय
कर्जत तालुक्यातील कोकणगाव – घुमरी तलाठी कार्यालयातील खासगी कर्मचार्याला १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
सचिन सुरेश क्षीरसागर असे आरोपीचे नाव
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतीचे वाटणीपत्र करून त्याआधारे फेरफार नोंद करून उतारा मिळण्यासाठी मागितली होती लाच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस.टी गाड्यांना कर्नाटकात प्रवेश बंद
महाराष्ट्र एस.टीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंत सुरू
सांगलीहुन जमखंडीला जाणाऱ्या 2 बसेस आज एस टी प्रशासनाने केल्या रद्द
गुुरवारी राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद नागपुरात
गेल्या 24 तासात 3796 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
तर 23 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने वाढली चिंता
1277 जण कोरोनामुक्त झाले
कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तीन प्रतिष्ठान सील
बचपन ग्रो सुपर बाजार, डॉमिनोज पिज्जा, पंकज कढीवाला केले सील
सोबतच १८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई
१८ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. १,६५,००० चा दंड वसूल केला.
पथकानी बचपन ग्रो सुपर बाजार, पंचशील चौक, डॉमिनोज पिज्जा, पूनम बाजार, पंकज कढीवाला जरीपटका ला सील केले
तसेच पथकानी ५८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
धारावीत पुन्हा कोविडच्या केसेसमध्ये वाढ
– सहा महिन्यांनंतर 30 नवीन रुग्णांची नोंद
– तब्बल सहा महिन्यानंतर पुन्हा वाढला आकडा…
– धारावीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मनपाचा एक्शन प्लान…
– धारावीच्या मध्यभागी लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या योजनांना अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू….
– छोटा सायन रुग्णालय परिसरात लवकरच कोविड सेंटर ऊभारण्याची मनपाकडून तयारी सुरू…
– धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी
– सध्या 140 सक्रिय कोवीड केसेस
– असून 2.50 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या धारावीची लोकसंख्या 7 लाखांच्या घरात असल्याने तातडीने लसीकरणावर मनपाचा भर…
कोव्हीशिल्ड लसीचा साठा संपुष्टात
आधी माहिती न कळवल्याने जेष्ठ नागरिकांमध्ये संताप
माहिती न देताच लस केंद्र परस्पर बंद
शुक्रवार पर्यंत लसीचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता
पुणे जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेन्मेंट झोनच्या संख्येत वाढ
सद्य स्थितीत 1 हजार 460 कंटेन्मेंट झोन
कंटेन्मेंट झोनमध्ये 3 हजार 771 सक्रिय कोरोनाबधित रुग्ण
कंटेन्मेंट झोनबरोबरच ‘हॉटस्पॉट’गावांची संख्याही वाढ
मुदत ठेवीवर चांगला पवा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ९१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक जगदीश उणेचा यांना अटक
याप्रकरणी सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे राहणार्या एका ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली फिर्याद
त्यानुसार जगदीश उणेचा, त्यांची पत्नी व मुलगा राकेश उणेचा या तिघांवर ठेवीदार हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल
ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
त्याचबरोबर मास्क, लग्न व अन्य सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर कारवाई करण्याचे आदेश
काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याबरोबर ‘सुपर स्प्रेडर’ वेळीच शोधून काळजी घेण्याच्या सूचना,
तर ‘हाॅटस्पाॅट’मध्ये कडक उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांनी यंत्रणेला दिलेत
उरण पोलिसांची धडक कारवाई ;बायो डिझेलचा टँकर जप्त
लाखोंचा बुडविला जात होता सरकारचा महसूल
बायोडिझेलच्या वापराने सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडित
उरणच्या कारंजा जेटीवर बोटीसाठी बायो डिझेलचा वापर
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंग यांना बदलणे म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. कोरोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला.
टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लाँबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या. त्या काड्यांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.