Maharashtra Marathi News Live | पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी, पुन्हा आढळला झिका
Maharashtra Mumbai Marathi News Live : आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. महाविकास आघाडीचं लोकसभेसाठीचं जागावाटप जवळपास निश्चित आहे. कोणता पक्ष किती जागा लढणार? हे सुद्धा ठरलं आहे. फक्त दोन-तीन जागांचा तिढा आहे. तो प्रश्न चर्चेतून सोडवण्यात येईल. शिवसेना शिंदे गटातील दोन मोठे नेते खासदार गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातील वाद आता मिटला आहे. दोघांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ‘गजानन कीर्तीकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा’, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर रामदास कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली.
LIVE NEWS & UPDATES
-
Pune | पुण्यात पुन्हा आढळला झिका व्हायरस
पुणे | पुणेकरांना हादरवणारी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात पुन्हा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. एक 64 वर्षाची येरवडा येथील महिला झिका पॉझिटिव्ह आढळली आहे. या महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. त्यानंतर ब्लड टेस्ट करण्यात आली. बल्ड रिपोर्ट 10 नोव्हेंबर रोजी NIV कडे पाठवण्यात आला. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी झिका पॉझिटीव्ह अहवाल आला. ती महिला 15 ऑक्टोबर रोजी केरळ इथे गेली होती. तेव्हा तिला झिकाची बाधा झाल्याची शक्यता आहे.आता महिलेची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील 5 जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत.
-
दरभंगा रेल्वेगाडीला भीषण आग
नवी दिल्ली | दरभंगा रेल्वेगाडीला भीषण आग लागली आहे. 2 डब्यांना लागली आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही गाडी दिल्लीहून बिहारमधील दरभंगाकडे जात होती. या दरम्यान इटावा जवळ ही आग लागली. आगीचं कारण अजून समजू शकलेलं नाही. आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
-
-
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं हिमंता बिस्वा सरमा यांना प्रत्युत्तर
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली. भूपेश बघेल म्हणाले की, ” मी घाबरत नाही. तुमच्या (हिमंता बिस्वा सरमा) सारखे आम्ही फरार नाही. आम्ही धैर्याने सामना करतो. जर आम्ही काही चुकीचं केलं नाही तर घाबरण्याची गरज नाही. भाजपा आणि केंद्र सरकार काहीही करो.”
#WATCH भिलाई, दुर्ग: असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा के बयान पर छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल ने कहा, "… भूपेश बघेल डरने वाला नहीं है। आपकी(हिमंत बिस्वा सरमा) तरह हम भगोड़े नहीं हैं। हम लोग डटकर सामना करते हैं। अगर हमने कुछ गलत नहीं किया तो डरने का सवाल ही नहीं बनता।… pic.twitter.com/K9mBCo2TJ0
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2023
-
राजस्थान काँग्रेसमध्ये मतभेद नाही : पवन खेडा
राजस्थानमधील मतभेदाच्या बातम्यांवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी आपल्या पक्षात मतभेद नसल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये मतभेद असून 6 गट आहेत. आता आम्ही मतं मिळवू.
-
जम्मू-काश्मीरः डोडा दुर्घटनेतील मृतांची संख्या 37 वर पोहोचली
जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांची संख्या 37 वर पोहोचली आहे. या घटनेत 19 जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांना एअर अॅम्ब्युलन्समधून जम्मूच्या जीएमसी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. डोडाचे उपायुक्त हरविंदर सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
-
-
आपचे खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंगातून लिहिले पत्र
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी तिहार तुरुंगातून एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्याने आपण प्रत्येक लढाई लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. जनतेला आवाहन करून ते म्हणाले की, तुम्हीही हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवा, जय हिंद!
-
मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
गडचिरोली जिल्ह्यातील बुर्गी पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गावकऱ्यांसोबत फराळ वाटप केले. शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. पोलीस इमारतीचे भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या नक्षलवाद्यांच्या गडामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस जवान व त्यांच्या कुटुंबासोबत आज दिवाळी साजरी केली. यावेळी मोठा उत्साह गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दिसून आला.
-
70 वर्षे पुरावे असूनही आरक्षण दिले नाही
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. गेले 70 वर्षे पुरावे असूनही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले नाही, असा घणाघात त्यांनी घातला. जितकी जमीन महत्वाची तितकेच आरक्षण महत्वाचे आहे, हे मराठा समाजाच्या लक्षात आले आहे. समाजातील लोकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
मुख्यमंत्री थोड्याचवेळात गडचिरोलीत
गडचिरोली अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बोर्गी पोलीस स्टेशनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. नक्षलग्रस्त भागातील पोलीस जवानांसोबत बेस कॅम्पवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी साजरी करणार आहेत. हा भाग अतिशय दुर्गम आहे. हे पोलीस स्टेशन छत्तीसगड सीमावर्ती भागात आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू असून थोड्याच वेळात मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेतय नक्षलग्रस्त भागात शिक्षण घेत असलेल्या शाळाकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री नागपूर विमानतळावरुन गडचिरोलीसाठी रवाना झाले आहेत.
-
अद्वय हिरे यांच्या अडचणीत वाढ
अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. भोपाळ येथून अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. NDCC बँक घोटाळा तसेच शिक्षण संस्थेतील अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अद्वय हिरे आणि हिरे परिवारातील इतर सदस्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
बारामती बंदची दिली हाक
बारामतीत सुरु असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांनी बारामती बंदची हाक दिली आहे. १६ नोव्हेंबर रोजी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. आरक्षणासाठी उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. या उपोषणाला भाजप नेते राम शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली..यावेळी शिंदे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. सरकारने दिलेला कालावधी हा दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.
-
सुनेत्रा पवार आणि अजित दादाच्या आईची चुक काय ? – रोहित पवार
नगर : अजित पवार यांच्यासोबत राजकीय दृष्टया आमचे मतभेद आहेत. परंतु, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतभेद असले तरी कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे अशी शरद पवार यांची भूमिका आहे. यात सुनेत्रा पवार आणि अजित दादाच्या आईची चुक काय? ज्येष्ठांच्या भूमिकेमुळे आणि तरूणाईलाही वाटतं की एकत्र कौटुंबिक कार्यक्रमाला यायला हवं, असे परखड मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
-
वाद झाला, वडापाव विक्रेत्याने रेल्वेमधून प्रवाशाला खाली ढकलले
लातूर : औरंगाबाद-हैद्राबाद पॅसेंजर रेल्वेमधून एका प्रवाश्याला खाली ढकलल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या हेर स्टेशनजवळ घडली. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवासी बालाजी जानोळे यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बालाजी जानोळे हे आपल्या पत्नी आणि मुलासोबत औरंगाबादवरून हैद्राबाद इथं जात होते. रेल्वेत वडापाव विकणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचे भांडण झाले आणि याच वादातून वडापाववाल्याने बालाजी यांना खाली फेकले.
-
करमाळा तालुक्यात 171 एकरावर जरांगे पाटील यांची ऐतिहासिक सभा
सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज सायंकाळी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील पहिलीच सभा असल्याने मोठी उत्सुकता लागलेली आहे. उजनी धरणाच्या कुशीतील 171 एकरावर ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचा अंदाज आहे.
-
ऍम्ब्युलन्स पलटली, पाच जण गंभीर जखमी
लातूर : औसा रस्त्यावर बुधोडा गावाजवळ ऍम्ब्युलन्स उलटली. या अपघातात ऍम्ब्युलन्समधील पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. लातूरकडून सोलापूरकडे ही ऍम्ब्युलन्स भरधाव वेगात निघाली होती. बुधोडा गावाजवळ डिव्हायडर ओलांडून पलीकडे असलेल्या वाहनावर जाऊन ऍम्ब्युलंस आदळली. जखमी झालेल्या पाच जणांवर लातूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
-
आपला दणका असा की, टप्प्यात आला की कार्यक्रम वाजीलाच – मनोज जरांगे पाटील
बीड : आपल्याला 70 वर्ष आरक्षण नोंदी नाहीत म्हणून आरक्षण खाल्ले. आता लाखाने पुरावे सापडत आहेत. ज्यांनी पुरावे मिळू दिले नाही आता त्यांचे नाव कळले पाहिजे. नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे सरसगट आरक्षण दिले पाहिजे. गावोगावी जाऊन मराठे जागरूक करा. एक डिसेंबरला गावागावात साखळी उपोषण करायचे आहे असे आवाहन बीड येथे मनोज जरांगे पाटील यांनी केले. आता बघू सरकार किती भारी भरते ते. सर्व जण मिळुन आता एकजुट करा. आपला दणका असा आहे की, टप्प्यात आला की कार्यक्रम वाजीलाच असा इशाराही त्यांनी दिला.
-
आमदार रोहित पवार यांनी व्यक्ती केली मोठी खंत
मी माझ्या मुलीला जेवढा वेळ दिला तेवढा मला माझ्या मुलाला वेळ देता आला नाही राजकारणात आल्यावर ते शक्य झाले नाही, असे म्हणताना आमदार रोहित पवार हे दिसले आहेत.
-
अजित पवार मुंबईकडे रवाना
बारामतीतील पवारांची दिवाळी साजरी. भाऊबीज करुन अजित पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या शरद पवार कापसेवाडीला जाणार आहेत. दिवाळी साजरी करुन सदस्य आपापल्या कामासाठी रवाना झाल्याचे बघायला मिळतंय.
-
आमदार रोहित पवारांची संघर्ष यात्रा पारनेरमध्ये दाखल
आमदार रोहित पवारांची संघर्ष यात्रा पारनेरमध्ये दाखल झालीये. पारनेरच्या सुपा येथून रोहित पवारांच्या रॅलीला सुरुवात. विधवा महिलांसोबत रोहित पवार करणार भाऊबीज साजरी. राष्ट्रवादी फुटीनंतर रोहित पवार पहिल्यांदाच आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात.
-
अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलेआहे. भोपाळमधून अद्वय हिरे यांना घेतलं ताब्यात. NDCC बँक घोटाळा तसेच शिक्षण संस्थेतील अपहार प्रकरणी घेतलं ताब्यात. अद्वय हिरे आणि हिरे परिवारातील इतर सदस्यांवर देखील करण्यात आला गुन्हा दाखलय.
-
कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी
कल्याण स्टेशन परिसरात चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटणारी टोळी सक्रिय झालीये. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये महिलांचाही समावेश आहे. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत दोन आरोपींना ठोकल्या बेड्या तर दोघांचा शोध सुरू आहे.
-
Maharashtra News : जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शंभर जेसीबी सज्ज
मनोज जरांगे पा़टील यांचे बीडच्या पेंडगावात जंगी स्वागत करण्यात येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शंभर जेसीबी बोलाण्यात आले आहे. माळी समाजाकडून जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे.
-
Maharashtra News : बीडच्या पेंडगावात मनोज जरांगे यांचं स्वागत
मनोज जरांगे पाटील आजपासून तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बीडच्या पेंडगावात मनोज जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
-
Maharashtra News : शरद पवार बारामतीतील सोनकसवाडी गावात दाखल
शरद पवार बारामतीतील सोनकसवाडी गावात दाखल झाले आहे. येथे ते स्थानिकांच्या भेटी घेत आहेत.
-
Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदूरबारमध्ये दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदूरबार दौऱ्यावर आहेत. ते नंदूरबार येथे दाखल झालेले आहेत. आज बिरसा मुंडा जयंती निमीत्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिवासी बांधवांना संबोधीत करणार आहेत.
-
World Cup: विश्वचषकाच्या सेमीफायलसाठी वानखेडे सज्ज
भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी मुंबईचे वानखेडे स्टेडीयम सज्ज झाले आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या संख्येने क्रिकेट पाहायला मिळत आहे.
-
कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या बंगल्यावर पुण्यातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचा मोर्चा
सांगली : कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीमधील बंगल्यावर पुण्यातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांनी मोर्चा काढला आहे. पुण्यातील जनरल मोटर्समधील 50 ते 60 कुटुंबातील कामगार सांगलीत मंत्री खाडे यांच्या बंगल्यासमोर दाखल झाले आहेत. कामगारांची फसवणूक केल्याचा जाब ते खाडे यांना विचारणार आहेत. सुरेश खाडे यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीचा तळेगाव पुणेमधील प्रकल्प हुंडाई मोटर्सला विकला जात आहे. हा करार होत असताना जनरल मोटर्सच्या १००० कायमस्वरूपी कामगारांचा रोजगार नव्याने येणाऱ्या कंपनीत दिला जात नाही. नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहीत नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात अशी कामगारांची प्रमुख मागणी आहे.
-
गणपतीपुळे येथील व्हेल माशाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
रत्नागिरी- गणपतीपुळे येथील व्हेल माशाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनला तब्बल दहा तास पूर्ण झाले आहेत. व्हेल माशाचे पिल्लू खोल समुद्रात गेल्याचा दावा वनविभागाने केला आहे. रेस्क्यू ऑपरेशननंतर व्हेल माशाचे पिल्लू सुरक्षित असून तब्बल 45 तासांनंतर व्हेल माशाची सुखरूप सुटका करण्यात आली.
-
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा मुक्काम राजस्थानमध्ये
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा मुक्काम राजस्थानमध्ये असणार आहे. दिल्लीमधल्या गंभीर वायू प्रदूषणामुळे सोनिया गांधींनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आठ दिवस सोनिया या जयपूरमध्येच राहणार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. वायू प्रदूषणाचा त्रास होत असल्याने सोनिया गांधी जयपूरमध्येच राहणार आहेत.
-
नाशिक – फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या
नाशिकमध्ये फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने वार करून केली हत्या. नाशिकच्या पथाडी गावात रात्री ही दुर्दैवी घटा घडली.
याप्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ला करणारा एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
-
राहुल गांधींना मिळणाऱ्या पाठिंब्याचं मोदींनी भय – संजय राऊत
नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याच मोदींना भय वाटतं, असं संजय राऊत म्हणाले. मोदींनी राहुल गांधींवर उत्तर देणं हाच त्यांचा विजय आहे.
-
बारामतीचं मैदान शरद पवार हेच मारतील – संजय राऊत
2024 साली शरद पवारांचा पक्ष अजितदादा गटाला माती चारणार. भविष्यात पवार – ठाकरेंच राजकारण यशस्वी होणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
-
खऱ्या निष्ठावंताला पदाची लालसा नसते – संजय राऊत
खऱ्या निष्ठावंताला पदाची लालसा नसते. बाळासाहेबांचे निष्ठावंत संकट आल्यावर पळून जात नाहीत. आम्हीच खरे निष्ठावंत म्हणणारे मूर्ख अशी टीका राऊत यांनी केली.
-
निष्ठा हा आमचा प्राण, निष्ठा नसेल तर जगण्यात काही अर्थ नाही – संजय राऊत
राजकारणात निष्ठा असलीच पाहिजे, निष्ठा नसेल तर जगण्याला काही अर्थ नाही. निष्ठा हा आमचा प्राण आहे, असे संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांचे निष्ठावंत संकट आल्यावर पळून जात नाहीत.
2024 साली केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. त्यासाठी ते नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. थोड्याच वेळात ते नंदुरबारच्या दिशेने रवाना होतील.
-
पाडव्यानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दिपोत्सव साजरा
दिपावली पाडव्याच्या पार्श्भूमीवर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवात २१ हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्यात. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली.
मोठ्या संख्येने भाविक देखील यावेळी उपस्थित होते. दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालं.
-
पुणे – शहरातील राजकीय परंपरा असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचं आज आयोजन
पुणे शहरातील राजकीय परंपरा असणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. दिवाळीनिमित्त यावेळी वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय प्रमुख पाहुणे येणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत.तसेच पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष वाडेश्वर कट्ट्यावर आज हजर आहेत. वाडेश्वर कट्ट्यावर आज राजकीय गप्पा रंगणार आहेत.
-
भुसावळ – आवक वाढल्याने ऐन दिवाळीत भाजीपाल्याचे दर घसरले, ग्राहकांना दिलासा
आवक वाढल्याने ऐन दिवाळीत भाजीपाल्याचे दर घसरून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत बहुतांश भाजीपाल्याचे प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांनी कमी झाले आहेत.
मेथीचे उत्पादन वाढल्याने किलोऐवजी पाच रूपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. इतर 40, भाजीपाला 30 ते 60 रुपये किलोदरम्यान आहे.
-
शासनकडून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा, दिवाळी उलटली तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ नाही
शासनकडून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे. दिवाळी उलटली तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची अग्रीम रक्कम म्हणून केवळ 78 रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांसाठी मागील वर्षीचा पीकविमा म्हणून केवळ आठ लाख रुपये झाले मंजूर झाले.
-
Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील यांच्यावर 100 जेसीबीतून होणार फुलांची उधळण
मनोज जरांगे यांच्या वाशी येथील सभेची तयारी पूर्ण. जरांगे यांच्यावर माळी समाजाच्या वतीने 100 जेसीबीतून केली जाणार फुलांची उधळण, 1 टनाचा हार घातला जाणार. सभेच्या ठिकाणी रांगोळी व बॅनर लावून नागरिक सज्ज तर वाशी शहरात मंत्री, आमदार, नेत्यांना केली आहे शहरप्रवेश बंदी. जरांगे यांच्या दौऱ्याची तिसऱ्या टप्प्याची सुरुवात. धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे, नंतर परंडा येथे होणार सभा.
-
Mumbai news | भायखळ्यात मदनपुरा इमारतीला भीषण आग
भायखळ्यात मदनपुरा इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
-
Thane news | ठाण्यात टॉवरच्या पार्किंगमधील वाहनांना आग
रात्री एकच्या सुमारास ठाण्यातील सरोवर दर्शन टॉवरच्या पार्किंगमध्ये दुचाकी व चार चाकी वाहनांना अचानकपणे लागली आग. यामध्ये 13 दुचाकी व 3 चारचाकी वाहनांना आग लागली होती. सदर आग लागलेल्या 13 दुचाकी पैकी 11 दुचाकी पूर्णतः जळाल्याअसून वाहनाचे नुकसान झाले आहे. तसेच इतर चारचाकी वाहने जळाल्याने नुकसान झाले आहे.
-
Pune news | पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली
पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली. पुणे शहरात हवा प्रदूषणामध्ये मोठी वाढ. पुण्यातील एअर क्वालिटी इंडेक्स 150 वरून पोहोचला थेट 263 वर. पुणे महानगरपालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात. प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडून बांधकाम व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीसा
-
Nashik News : नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला
नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. शहरातील तापमानाचा पारा घसरला. नाशिकला गेल्या दोन दिवसांपासून पारा 15° च्या खाली. यंदा डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
-
Nagpur News : नागपूर महानगरपालिकेला किती हजार कुणबी नोंदी सापडल्या ?
नागपूर महानगरपालिकेकडे 21 हजार 966 कुणबींच्या नोंदी आढळल्या. प्रशासनाने आतापर्यंत एक लाखाच्या वर दाखले तपासले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन जोरात कामाला लागलं. नागपूर महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील एक लाखाच्या वर दाखले तपासले असून 1929 पर्यंत तब्बल 21 हजार 966 कुणबी नोंदणी असल्याची माहिती मिळाली
-
Navi Mumbai | वाशी मार्केटला आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान कोणाला?
दीपावलीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंबा वाशी मार्केटमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना देवगड हापूस चाखायला मिळणार आहे. देवगडमधील आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांनी वाशी मार्केटला आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान मिळवला आहे. हंगामा आधी वाशी मार्केटला देवगड हापूस आंब्याची पेटी पाठविण्यासाठी अनेक जण आंबा बागायतदार मोहोर टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
-
Manoj jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा
मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरु होणार आहे. ते मराठा समाजाच्या गाठी-भेटी घेणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यात पुण्यातील भोरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची पहिली सभा होणार आहे.
Published On - Nov 15,2023 7:52 AM