Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget Rural Area| गावागावांमध्ये उत्साह संचारणार, शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाची घोषणा

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण अभियान जाहीर केलं. ShivRajya Sundar Gram Abhiyan

Maharashtra Budget Rural Area| गावागावांमध्ये उत्साह संचारणार, शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाची घोषणा
शिवराज्य सुंदर ग्राम अभियान
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 5:16 PM

मुंबई: उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकाच्या काळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण अभियान जाहीर केलं. उपमुख्यमंत्र्यांनी शिवराज्य सुंदर ग्राम अभियान जाहीर केलं आहे. शिवराज्य सुंदर ग्राम अभियानामुळे राज्याच्या ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानावेळी निर्माण झालेले उत्साहात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Budget 2021 Ajit Pawar declared ShivRajya Sundar Gram Abhiyan for all Gram Panchayat in States)

शिवराज्य सुंदर ग्राम अभियान नेमकं काय?

ग्रामीण भागातील घनकचरा, सांडपाणी, शौचालय, व स्वच्छताविषयक कामे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गावातील वृद्ध नागरिक, महिला व बालकांसाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावणं हा शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ग्राम विकास खात्याला बजेटमध्ये काय मिळालं?

सन 2020-21 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेअंतर्गत एकूण 2 हाजर 924 कोटी 88 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. सन 2021-22 या आर्थिक वर्षात घरकुल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प माडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे.प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Budget 2021 Ajit Pawar full speech : महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प

मनसुख हिरेनप्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्यामागे काळंबेरं, आम्ही पोलखोल करू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Maharashtra Budget 2021 : मद्यावरील व्हॅटमध्ये 5 टक्क्यांनी वाढ, काय महाग काय स्वस्त?

(Maharashtra Budget 2021 Ajit Pawar declared ShivRajya Sundar Gram Abhiyan for all Gram Panchayat in States)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.