Maharashtra Budget | कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाढंऱ्या सोन्याला सरकार देणार झळाली; 1 हजार 325 कोटीची तरतूद

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आजरा, चंदगड तालुक्यातील पांढरं सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू आणि बोंडू प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने भरघोस अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budget | कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाढंऱ्या सोन्याला सरकार देणार झळाली; 1 हजार 325 कोटीची तरतूद
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:41 PM

मुंबईः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आजरा, चंदगड तालुक्यातील पांढरं सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू आणि बोंडू प्रकल्पासाठी शिंदे-फडणवीस सरकारने भरघोस अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोकणातील आणि आजरा, चंदगड तालु्क्यासाठी काजू धोरणाची निर्मिती आणि काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार असल्यान शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मदत होणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काजू बोंडू प्रकल्पाची योजना जाहीर केल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

कोकणासह आजरा आणि चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोकण आणि आजरा तालुक्यातील काजू खरेदी केली जात असली तर काजूचे बोंडू मात्र गोव्यातील उद्योजक अगदी कमी दराने बोंडू खरेदी करतात.

याचा फटका काजू उत्पादक शेतकऱ्यांना बसत असतो. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काजू प्रक्रियेसाठी कोकणासाठी 200 कोटीच्या भागभांडवलासह काजू धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा कोकणासह आजरा आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

साध्या काजूपेक्षा प्रक्रिया केलेल्या बोंडूची किंमत ही 7 पटीने अधिक आहे. काजू उत्पन्न वाढीसाठी कोकण आणि आजरा व चंदगड तालुक्यासाठी काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

यामुळे काजूच्या लागवडीपासून प्रक्रिया आणि विक्री पर्यंत शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी काजू फळ विकास योजना, संपूर्ण कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यासाठी राबवण्यात येणार आहे.

पाच वर्षात 1 हजार 325 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा या कोकणासह आजरा आणि चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.