गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर सरकार थांबवणार; गावागावात विकास कार्यक्रम राबविले जाणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले की, या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर सरकार थांबवणार; गावागावात विकास कार्यक्रम राबविले जाणार
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 3:43 PM

मुंबईः रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने मात्र आता त्याच्यावर उपाय शोधून काढला आहे. रोजगारासाठी गावा गावातून होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आता रोजगार आणि स्वयंरोजगाराची आरखडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मांडले आहेत. शहराकडे होणारे स्थलांतर थांबावे यासाठी राज्यातील 500 ग्रामपंचायतींमधून कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्याचा योजना शिंदे-फडणवीस सरकारने आखली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रोजगाराविषयी महत्वाची तरतूद केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये रोजगारबरोबरच ग्राम विकासासाठी त्यांनी महत्वाची तरतूद केली आहे.

यावेळी त्यांनी गावा गावातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच ग्रामपंचायतींचा त्यामध्ये सहभाग असावा यासाठीही त्यांनी योजना आकली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गावाागावातून होणारे युवकांचे स्थलांतर रोखण्यासाठी 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे.

गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर यामुळे थांबण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगारसाठी प्रयोगिक तत्वावर 500 ग्रामपंचायतीमधून कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरी भागातही मनगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये याद्वारे कार्यक्रम आखला जाणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये 200 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

तसेच कौशल्य वर्धानाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्साठी पुढील तीन वर्षात 2 हजार 307 कोटींची तरतूद अतिरिक्त गुंतवणूक 500 औद्योगिक संस्थांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे.

तसेच 75 संस्थांचे आधुनिकीकरण करून त्याद्वारे युवकांना रोजगाराचे धडे देण्यात येणार आहेत. या योजनांसाठी 610 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले की, या माध्यमातून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नवनव्या योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.