वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी शासकीय आणि खासगी भागिदारी धोरणाला मंजुरी,अमित देशमुख यांची माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित करण्यात आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. कॅबिनेटमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता दिली. येणाऱ्या काळात बदल होतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित करण्यात आलं आहे. राज्यात 18 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत आहेत. 8 ठिकाणी महाविद्यालय आणि रुग्णालय प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय जेथे सुरू झालेलं नाही तेथे फायदा होईल, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. खासगी संस्था आणि विद्यालय चालवणाऱ्यांना सोबत घेऊ, असं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण होईल, असंही ते म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदं भरणार
वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरत येतील, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली. महाविद्यालय सुरू करणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होईल, असा सरकारचा मानस आहे. राज्य शासनाचे सर्व प्रकल्प असतील त्यामध्ये शिक्षणाचा दर्जा, वैद्यकीय सेवा जलदगतीने लोकांपर्यंत पोहचावी हा मुख्य हेतू असेल, असंही ते म्हणाले. वैद्यकीय सुविधा जेथे कार्यान्वित आहेत, तेथे गरज नाही. सुपरस्पेशालिटी उपलब्ध करायला असेल तर करू, असंही ते म्हणाले. आरोय सुविधा जिल्हा जिल्ह्यात तातडीने खासगी भागीदार तत्वावर उपलब्ध करणार आहोत. असंही देशमुख यांनी सागितलं आहे. शैक्षणिक शुल्कामध्ये फरक पडणार नाही, असंही ते म्हणाले.
इतर निर्णय
शालेय शिक्षण विभागाच्यावतीनं भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. याशिवाय आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय घेण्यात आला. आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भारतरत्न राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचं काम पुण्यात सुरू करण्यात येणार आहे. 8 एकर जागेत उभारणार ही नगरी उभारण्यात येणार आहे. 191 कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे.
आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 488 शाळांची निवड यासाठी करण्यात आली आहे. तर, 494 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. टास्क फोर्स बरोबर बैठक झाली आहे. बालरोगतज्ज्ञ आणि टास्कफोर्स यांच्यात बैठक झाली आहे. एसओपीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर एसओपी पुन्हा ठरवली जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. तर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट 2021 मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आलं.
इतर बातम्या:
State Cabinet Meeting : वैद्यकीय महाविद्यालय, आदर्श शाळा बांधकामांबाबत महत्वाचे निर्णय
12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा आज सुटण्याची आशा, मुख्यमंत्री-राज्यपालांच्या भेटीची वेळ ठरली!
2021 पासून शिवसेनेची घोषणा ‘पहले मदिरायल बाद में मंदिर’, शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Cabinet Meeting chaired by Uddhav Thackeray Medical Education department taken to start medical college on government and private partnership info given by Amit Deshmukh