Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting : पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजारांची मदत

Uddhav Thackeray cabinet meeting decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

Cabinet Meeting : पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजारांची मदत
Uddhav Thackeray cabinet meeting
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 7:46 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पूरग्रस्त भागातील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सध्या तात्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्रात तुफान पाऊस आणि दरड दुर्घटनामुळे मोठं नुकसान झालं आहे. जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातलं. त्यामुळे पूरग्रस्तांना नियमांच्या पलिकडे जाऊन मदत करण्याची भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या निकषांपलिकडे जाऊन कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली. NDRF च्या निकषांनुसार दिली जाणारी मदत कमी आहे. मात्र झालेलं नुकसान हे जास्त असल्याने नियम बदलून मदत दिली जाणार आहे.

खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात 

दरम्यान, ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी असे आदेश दिले होते. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर खासगी शाळांच्या 15 टक्के फी कपातीचा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

महाडमध्ये NDRF बेस कॅम्पची मागणी

महाडच्या तळीयेमध्ये दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर कोकणात एनडीआरएफचं बेस कॅम्प असावं या मागणीने जोर धरला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही महाडमध्येच एनडीआरएफ किंवा एसडीआरएफचं बेस कॅम्प असावं अशी मागणी केली आहे. महाडमध्येच बेस कॅम्प का असावं याची कारणमिमांसाही आदिती तटकरे यांनी केली आहे.

जयंत पाटील कॅबिनेट बैठक सोडून रुग्णालयात 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती.

संबंधित बातम्या   

BREAKING : जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात, अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली

महाडमध्येच एनडीआरएफचं बेस कॅम्प का?; आदिती तटकरे यांनी सांगितलं कारण!

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.