मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (11 मार्च) कोरोनाची लस (Covid 19 Vaccine) घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोवँक्सिन या लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. (Maharashtra CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination)
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. ही लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his first shot of COVID vaccine today. pic.twitter.com/3JWlmvKpHL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
“कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही”
कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. लस घेताना कळत नाहीत. कोरोनाचा धोका परत वाढतो. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचं अनावश्यक जाणं टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवार यांना कोरोना लस
दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही. (Maharashtra CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination)
संबंधित बातम्या :