राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra Cold Season Temperature decreasing in many place) 

राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 1:34 PM

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra Cold Season Temperature decreasing in many place)

पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

  • नाशिक – 11.1°C
  • परभणी – 10.6°C
  • परभणी अॅग्री युनिव्हर्सिटी – 8.8°C
  • पुणे – 11.5°C
  • सांताक्रुझ – 18.4°C (यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान)
  • जळगाव – 12.6°C
  • बारामती – 11.9 °C
  • औरंगाबाद – 13.0°C
  • गोंदिया – 10.5°C
  • नागपूर – 12.4°C

(Maharashtra Cold Season Temperature decreasing in many place)

संबंधित बातम्या : 

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद

MUMBAI LOCAL | सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता, 15 डिसेंबरनंतर लोकल सुरु करण्याचा सरकारचा विचार

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.