अदानी घोटाळ्याची चौकशी करा, ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या
मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसकडून धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
Congress Protest at ED Office : “अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी”, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या मागणीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसकडून धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढला आहे. अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने हा मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर सध्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड पाहायला मिळत आहे.
वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन
सध्या मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर अदानी हे देशाची लूट करत आहेत, अशा आशयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. सेबीने दिली सूट, अदानी करतोय लूट आणि ईडी बसलाय चूप, असे या बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.
सध्या ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकाराला घेराव घातला जात आहे.
राज्य सरकारला माझा सवाल आहे की ईडीचे नक्की काम काय? पैशांच्या बाबत जेव्हा कोणीही तक्रार करत तर त्याची चौकशी करणे हे ईडीचे काम आहे. या हिंडनबर्ग रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे की मोठा घोटाळा सुरु आहे. त्यामुळे याबद्दल चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार हे ईडीचे आहेत. ज्या सेबीवर आमचा विश्वास होता, त्यांच्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मग आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.
हिंडनबर्ग अहवालाविरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन
हिंडनबर्ग अहवालाविरोधात काँग्रेसची दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले. सेबीच्या प्रमुख निर्मला बुच आणि अडाणी समूह यांच्यातील मनी लाँड्रिंगची माहिती हिंडनबर्ग रिपोर्टने समोर आणली होती. त्यानंतर देशभरात विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी JPC ची स्थापना करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. सध्या मुंबईत यात मागणीसाठी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे.