महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 63 वर, राजेश टोपे शरद पवारांच्या भेटीला

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वरुन 63 वर पोहोचल्याची (Maharashtra corona cases update) माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 63 वर, राजेश टोपे शरद पवारांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 5:51 PM

मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वरुन 63 वर पोहोचल्याची (Maharashtra corona cases update) माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. Maharashtra corona cases update) 

काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली, सध्याची परिस्थिती सांगितली. केंद्राने आपल्याला चाचण्यांची परवानगी द्यावी, मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग लॅब आम्हाला करायच्या आहेत, केवळ किट्स केंद्राने उपलब्ध करुन द्यावे, असं राजेश टोपे म्हणाले.

या चर्चेदरम्यान, शरद पवारांनी तातडीने केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असं टोपेंनी सांगितलं.

राज्यात सद्यस्थितीला कोरोनाबाधितांचा आकडा 60 वर पोहोचला आहे. काल 52 होते आज 8 जण नवे रुग्ण आढळले आहेत. बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

शरद पवारांना सध्या महाराष्ट्राची पूर्ण माहिती सांगितली. टेस्टिंग फॅसिलीटी उपलब्ध करुन द्या असे सांगितले. सर्व लागणाऱ्या सुविधा द्या, सर्व खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली पाहिजे. आम्ही सर्व सुविधा देत आहोत.

रेल्वे एकतर रोखायला हवी किंवा जे गावी जात आहेत, त्यांच्यासाठी जास्तीच्या ट्रेन उपलब्ध  कराव्या अशी मागणी महाराष्ट्राने केंद्राकडे केली. कारण बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असल्याने मुंबई आणि पुण्यात रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत आहे. या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्या ठिकाणी इनफेक्शनची होऊ शकते.

सर्वांना काळजी घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं आहे, की पुढील 2 ते 3 दिवस बघू अन्यथा रेल्वेबाबत निर्णय घेतला जाईल, असं टोपेंनी अप्रत्यक्ष सांगितलं.

ज्या जीवनावश्यक सेवा आहेत, मेडिकल, फार्मसी, बँकिंग, याव्यतिरिक्त लोकांनी प्रवास टाळावा, असं आवाहन टोपेंनी केलं.

ट्रेन हा गर्दी ठिकाण आहे. त्याला कंट्रोल करावं लागेल.  कोरोनाबाधितांचा आकडा 11 ने नाही तर 8 ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे. इतर 3 रिपोर्टबाबत सांशकता आहे. यात मुंबई आणि पुण्याचे रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण जास्त आहेत.

जरी एखाद्या रुग्णाच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या तरी आपण त्यांना क्वारेंटाईन करत आहोत. आपण सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. लॅब वाढवण्याची गरज आहे. त्याबाबत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहेत.

त्याशिवाय विमानतळावरील पालिकेच्या डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना N-95 चा मास्क देणार आहे. जर नोकरीला जायचं असेल तरच लोक ट्रेनमध्ये बसतात. ज्या जीवनावश्यक सेवा आहेत. त्या लोकांनी जरुर ट्रेनमध्ये बसावं. पण इतरांनी प्रवास करुच नये. उद्या पंतप्रधानांनी कर्फ्यूचे पालन करायला सांगितले आहे. त्याचे प्रत्येकांनी पालन करा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 12
  • पुणे – 11
  • मुंबई – 20
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 4
  • कल्याण – 4
  • नवी मुंबई – 3
  • अहमदनगर – 2
  • पनवेल – 1
  • ठाणे -1
  • औरंगाबाद – 1
  • रत्नागिरी – 1
  • उल्हासनगर – 1 एकूण 65

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
  • मुंबई (1) – 18 मार्च
  • रत्नागिरी (1) – 18 मार्च
  • मुंबई महिला (1) – 19 मार्च
  • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
  • अहमदनगर (1) – 19 मार्च
  • मुंबई (2) – 20 मार्च
  • पुणे (1) – 20 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
  • पुणे (2) – 21 मार्च
  • मुंबई (8) – 21 मार्च
  • यवतमाळ (1) – 21 मार्च
  • कल्याण (1) – 21 मार्च
  • एकूण – 65 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
  • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...