मुंबई : राज्यात गेल्या काही दिवासांपासून वाढलेली कोरोना रुग्णवाढ (Corona Update)ही पुन्हा डोकेदुखी लागली आहे. कारण अवघ्या चोवीस तासात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ (Corona Numbers) झाली आहे. तसेच आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राज्यात आज नवा कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धडकी भरली आहे(Mumbai Corona Update). तर सोबतच मुंबईतला कोरोना रुग्णांचा आकडाही सतत चढताच आहे. बी. ए 5 या नव्या व्हेरीयंटची पुण्यातील महिलेला लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या 31 वर्षीय महिलेवर घरीच उपचार सुरू आहेत. तर राज्यात आज 1881 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 तासात कोरोना रुग्णसंख्या 2 हजाराजवळ गेली आहे.
Maharashtra | 1881 new COVID cases & 878 recoveries. No deaths today, 8432 active cases
BA.5 variant detected in a 31-year-old woman from Pune. The woman was asymptomatic and recovered in home isolation. pic.twitter.com/FRFifxNYi1
— ANI (@ANI) June 7, 2022
Video : Rajesh Tope Uncut | कोरोना रुग्णसंख्या नेमकी कोणत्या शहरात वाढली?@rajeshtope11
.#rajeshtope #coronaupdate #maharashtra
.
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/KlmGfKx5YQ— TV9 Marathi (@TV9Marathi) June 6, 2022
देशात गेल्या 24 तासात 3,714 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे.
#COVID19 Updates
Over 3.45 Cr 1st dose vaccines administered for age group 12-14 years
India’s Active caseload currently stands at 26,976
3,714 new cases reported in the last 24 hourshttps://t.co/1Bcrull8MT #IndiaFightsCorona pic.twitter.com/kGJB8OtESr
— PIB India (@PIB_India) June 7, 2022
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. सर्वजनिक ठिकाणी नियम पाळण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहान वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढती आकडेवारी आणि नवा व्हेरिएंट याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात पुन्हा काही निर्बंध लागू शकतात.