Maharashtra Corona Update : महाराष्ट्राला काहीसा दिलासा, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण संकट मात्र कायम
गेल्या 24 तासांत राज्यात 27 हजार 918 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 23 हजार 820 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण मंगळवारी महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, रविवार आणि सोमवारपेक्षा आज रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात कोरोनाचं संकट कायम आहे. कोरोना रुग्णसंख्येत आज काहीसा दिलासा मिळाला असला तर प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत.(27 thousand 918 people have tested corona positive on tuesday)
गेल्या 24 तासांत 27 हजार 918 नवे रुग्ण –
राज्यात गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या रुग्णसंख्येत आज काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 27 हजार 918 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 23 हजार 820 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 40 हजार 542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 27 लाख 73 हजार 436 वर पोहोचली आहे. त्यापैकी 23 लाख 77 हजार 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील आतापर्यंत 54 हजार 422 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
27,918 new cases have been reported in the state today
The state tally of #Covid_19 positive patients is now 27,73,436
District-wise details of cases and deaths until today are as follows:
(3/4)? pic.twitter.com/9Ij8yTHkkw
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) March 30, 2021
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईत गेल्या 24 तासांत 4 हजार 758 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 6 जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये 6 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर पोहोचलाय. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता थेट 50 दिवसांवर आला आहे.
#CoronavirusUpdates ३० मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/GUbYXQrDFy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 30, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुण्यात आज दिवसभरहात 3 हजार 226 नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3 हजार 268 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 32 हजार 806 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 725 रुग्ण गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील रुग्णसंख्येचा आकडा 2 लाख 64 हजार 885 वर पोहोचलाय. त्यातील 2 लाख 26 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 270 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरातील कोरोना स्थिती –
नागपुरातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. गेल्या 4 दिवसांपासून नागपुरात रोज 50 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. आज 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 156 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 1 हजार 191 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 23 हजार 153 वर पोहोचलीय. त्यातील 1 लाख 79 हजार 904 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 5 हजार 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकमधील कोरोना स्थिती –
नाशिकमध्ये आज तब्बल 3 हजार 532 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 2 हजार 641 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. आज आढळलेल्या नाशिक महापालिका हद्दीत 2 हजार 96, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 269, मालेगाव महापालिका हद्दीत 121 तर जिल्ह्याबाहेरील 46 रुग्णांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
माणसाच्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर राजेश टोपेंची ‘सीधी बात’
27 thousand 918 people have tested corona positive on tuesday