Corona Update : यंदाची आषाढी वारी मात्र निर्बंधमुक्त, आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट; मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये रुग्णवाढ, टेस्टिंग वाढवणार

मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह राज्यातील 6 राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. राज्यात मास्कसक्ती नसली तरी मास्क घालण्याचा आग्रह आम्ही करत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.

Corona Update : यंदाची आषाढी वारी मात्र निर्बंधमुक्त, आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट; मुंबई, ठाणे, पुणे, रायगडमध्ये रुग्णवाढ, टेस्टिंग वाढवणार
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 6:20 PM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona Virus) डोकं वर काढतोय. मागील तीन दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळत आहे. रोज एक हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह राज्यातील 6 राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे. राज्यात मास्कसक्ती नसली तरी मास्क घालण्याचा आग्रह आम्ही करत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले. त्याचबरोबर यंदाची आषाढी वारी (Ashadhi Wari) कोरोना निर्बंधमुक्त असेल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलंय.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांना मास्क घालण्याची सक्ती नाही, मात्र मास्क घालण्याचा आग्रही आम्ही करत आहोत. मुंबईसह राज्यातील सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आषाढी वारीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. आषाढी वारीचं नियोजन आता पुढे गेलं आहे. आता मागे वळून चालणार नाही. लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे यंदाची वारी कोरोना निर्बंधमुक्त असणार आहे. मात्र, सर्वांनी काळजी घ्यायची आहे, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलंय.

अजित पवारांकडून पुण्यात बैठक

रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत वारीबाबत महत्वाची बैठक पार पडली. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील विषयावर सविस्तर माहिती दिली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाचं नियोजन केलं. वारीची सर्व तयारीही व्यवस्थित झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे वारीवर बंधनं आणावी लागली होती. यंदा 15 लाख भाविक जमतील असं अजित पवार म्हणाले. आजच्या बैठकीत अजित पवार यांच्यासमोर पालखी मार्गांचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. तसंच पालखी मार्गात कोणकोणत्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचीही माहिती अजित पवारांना देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा?

>> पालखी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.

>> 1 हजार 800 फिरत्या शौचालयांची सुविधा देण्यात आली

>> फिरत्या शौचालयापैकी 50 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव

>> सॅनिटायझर, औषधं, डॉक्टरांची व्यवस्था पालखी मार्गावरील जिल्हा परिषद विभाग करणार

>> वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजुची मांसाहार, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता

>> वारी काळात एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार

>> विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन लाईव्ह मिळण्याची सोय

>> नेहमीपेक्षा अधिक बसेस सोडल्या जाणार

>> 25 हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांची वारीत नेमणूक केली जाणार

>> दरवर्षीपेक्षा यंदाच्या वारीत पोलिसांची संख्याही अधिक असणार

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.