मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट बनत चालली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 62 हजार 97 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आज 54 हजार 224 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थिती अधिकाधिक चिंताजनक बनत असल्याचं चित्र आजच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. (Corona condition in the state is critical, 62 thousand 97 new corona patients)
आजच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या 6 लाख 83 हजार 856 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 39 लाख 60 हजार 359 वर पोहोचली आहे. तर त्यातील 32 लाख 13 हजार 464 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 61 हजार 343 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 38 लाख 76 ङजार 998 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 27 हजार 690 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 62,097
*⃣Recoveries – 54,224
*⃣Deaths – 519
*⃣Active Cases – 6,83,856
*⃣Total Cases till date – 39,01,359
*⃣Total Recoveries till date – 32,13 464
*⃣Total Deaths till date – 61,343
*⃣Total tests till date – 2,43,41,736
1/4?— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 20, 2021
मुंबईत आज दिवसभरात 7 हजार 214 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 9 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईमध्ये 35 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 4 लाख 96 हजार 263 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्के झालाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या 83 हजार 934 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
#CoronavirusUpdates
२० एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -७२१४
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९६४१
बरे झालेले एकूण रुग्ण- ४,९६,२६३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८४%एकूण सक्रिय रुग्ण-८३,९३४
दुप्पटीचा दर- ४७ दिवस
कोविड वाढीचा दर (१३ एप्रिल-१९ एप्रिल)- १.४४%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 20, 2021
पुणे शहरात आज दिवसभरात 5 हजार 138 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 6 हजार 802 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या 52 हजार 977 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 1 हजार 277 जणांची प्रकृती गंभीर आहे.
आजच्या आकडेवारीनुसार पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 962 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 3 लाख 17 हजार 767 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार २० एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ५२,९७७
◆ नवे रुग्ण : ५,१३८ (३,७६,९६२)
◆ डिस्चार्ज : ६,८०२ (३,१७,७६७)
◆ चाचण्या : २०,२०४ (१९,२१,८२८)
◆ मृत्यू : ५५ (६,२१८)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/EZYFPXf4mY— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 20, 2021
संबंधित बातम्या :
मोदी लॉकडाऊन नको म्हणत असताना ठाकरे सरकार आता कडक लॉकडाऊन लावणार का? काय आहेत पर्याय?
Corona condition in the state is critical, 62 thousand 97 new corona patients