मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रात पुढील 15 दिवस संचारबंदी आदेश लागू राहणार आहे. अशावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आज दिवसभरात 58 हजार 952 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत 39 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत. (Corona outbreak continues in Maharashtra, 58 thousand 952 new patients in a day)
आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 लाख 78 हजार 160 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 29 लाख 5 हजार 721 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 58 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 6 लाख 12 हजार 70 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 58,952
*⃣Recoveries – 39,624
*⃣Deaths – 278
*⃣Active Cases – 6,12,070
*⃣Total Cases till date – 35,78,160
*⃣Total Recoveries till date – 29,05,721
*⃣Total Deaths till date – 58,804
*⃣Total tests till date – 2,28,02,200
1/4?— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 14, 2021
मुंबईत आज दिवसभरात 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 276 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. आज दिवसभरात मुंबईत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 87 हजार 443 सक्रीय रुग्ण आहेत.
नव्या आकडेवारीसह मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर येऊन ठेपलाय. 7 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.71 टक्क्यांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
१४ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -९९२५
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९२७३
बरे झालेले एकूण रुग्ण- ४,४४,२१४
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८१%एकूण सक्रिय रुग्ण-८७,४४३
दुप्पटीचा दर- ४० दिवस
कोविड वाढीचा दर (७ एप्रिल-१३ एप्रिल)- १.७१%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 14, 2021
पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 895 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 53 हजार 326 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 158 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आजच्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 29 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 84 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 902 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार १४ एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ५३,३२६
◆ नवे रुग्ण : ४,२०६ (३,४४,०२९)
◆ डिस्चार्ज : ४,८९५ (२,८४,८०१)
◆ चाचण्या : २१,३२५ (१७,८६,६७१)
◆ मृत्यू : ४६ (५,९०२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/EcrG2tWOkw— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 14, 2021
नागपुरात आज दिवसभरात 5 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 993 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासांत नागपुरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 97 हजार 36 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 28 हजार 71 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 960 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown Sanchar Bandi : महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी लागू, अंतिम नियमावली जरुर पाहा
Corona outbreak continues in Maharashtra, 58 thousand 952 new patients in a day