Maharashtra Corona Update : काहीसा दिलासा, दिवसभरात 52 हजार 313 रुग्ण कोरोनामुक्त, नवी रुग्णसंख्या मात्र चिंताजनक
राज्यात आज दिवसभरात 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेलं कोरोनाचं थैमान आज काहीसं निवळल्याचं चित्र आहे. पण चिंता मात्र कायम आहे. त्याचं कारण असं की राज्यात आज दिवसभरात 52 हजार 312 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात 51 हजार 751 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिवसभरात 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (Increase in number of corona patients in Mumbai, Pune, Nagpur)
नव्या आकडेवारीसह राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचली आहे. त्यातील 28 लाख 34 हजार 473 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में 51,751 नए #COVID19 मामले, 52,312 रिकवरी और 258 मौतें दर्ज़ की गई।
कुल मामले: 34,58,996 कुल रिकवरी: 28,34,473 मृत्यु: 58,245 सक्रिय मामले: 5,64,746 pic.twitter.com/6KS9eEQnWM
— ANI_HindiNews (@AHindinews) April 12, 2021
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईत गेल्या 24 तासांत 6 हजार 905 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 9 हजार 37 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 36 जणांचा काही दीर्घ आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.
नव्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवसांवर येऊन ठेपलाय. 5 एप्रिल ते 11 एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर हा 1.89 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates १२ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/WpRHaRyhxM
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 12, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 849 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 896 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज मृतांचा आकडा चिंताजनक बनलाय. आज दिवसभरात पुण्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 12 मृत रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 53 हजार 376 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आजच्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 34 हजार 510 झालीय. त्यातील 2 लाख 75 हजार 333 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 801 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे ४ हजार ८४९ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ८४९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ३ लाख ३४ हजार ५१० इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 12, 2021
नागपुरातील कोरोना स्थिती –
नागपुरातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस चिंता वाढवणारा ठरतोय. नागपुरात आज दिवसभरात 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात 5 हजार 661 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 84 हजार 217 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 20 हजार 560 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 838 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
‘कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो’, धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं
धक्कादायक! रुग्णालयाने जिवंत कोरोना रुग्णाला केले मृत घोषित, पत्नीच्या प्रसंगावधानानं अनर्थ टळला
Increase in number of corona patients in Mumbai, Pune, Nagpur