मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतोय. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.(Corona test positive for 35,952 people in Maharashtra on Thursday)
राज्यात काल (25 मार्च) 35 हजार 952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 20 हजार 444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2283037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 262685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 25, 2021
मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 504 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत काल 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 7 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 10 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 88 टक्के आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 75 दिवसांपर्यंत खाली आला आहे.
#CoronavirusUpdates
२५ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/ytbJT42nSm— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 25, 2021
पुण्यातील कोरोनास्थिती अधिकाधिक चिंताजनक होत आहे. पुण्यात काल दिवसभरात 3 हजार 286 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 200 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात कालही मृतांचा आकडा वाढलाय. काल दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 8 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 28 हजार 578 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 599 जणांचा अवस्था गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 137 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे ३ हजार २८६ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ३ हजार २८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ४७ हजार ६२९ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 25, 2021
नागपुरात काल दिवसभरात 3 हजार 579 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात तब्बल 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान मृत्यू रोखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. नागपुरात काल बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या 2 हजार 285 होती. कालच्या वाढलेल्या रुग्णांसह नागपुरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 लाख 7 हजार 67 वर पोहोचलीय. त्यातील 1 लाख 67 हजार 464 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरात आतापर्यंत 4 हजार 784 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल दिवसभरात तब्बल 2 हजार 994 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काल आढळलेल्या रुग्णांपैकी महापालिका क्षेत्रात 1 हजार 739, नाशिक ग्रामीणमध्ये 1 हजार 160, मालेगाव मनपा हद्दीत 47, जिल्ह्याबाहेरील 48 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 274 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
नांदेडमध्येही दिवसेंदिवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 53 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत 36 हजार 555 कोरोनारुग्ण आढळले आहेत. त्यातील 27 हजार 328 जण कोरोनमुक्त झालेत. तर 683 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या पाच दिवसांची आकडेवारी पाहिली तर 5 हजार 769 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
ठाण्यात काल दिवसभरात 932 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 304 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाण्यात आतापर्यंत 71 हजार 942 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 64 हजार 441 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 374 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
संबंधित बातम्या :
Nashik Lockdown update : नाशिकची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, नियम न पाळणारी दुकानं 6 महिन्यांसाठी बंद
Corona test positive for 35,952 people in Maharashtra on Thursday