Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांत तब्बल 40 हजार 414 नवे रुग्ण, 108 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. (40 thousand 414 people tested positive for corona in one day on Sunday, 108 died due to corona)
गेल्या 24 तासांत 40 हजार 414 नवे रुग्ण
राज्यातील गेल्या 24 तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 71 लाख 3 हजार 875 झाली आहे. त्यातील 2 कोटी 33 लाख 2 हजार 453 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 25 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 40,414 fresh COVID-19 cases, 17,874 discharges, and 108 deaths in the last 24 hours
Total cases: 2,71,3875 Total discharges: 2,33,2453 Active cases: 3,25,901 Death toll: 54,181 pic.twitter.com/mcvJX8za4V
— ANI (@ANI) March 28, 2021
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 6 हजार 923 जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 380 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 7 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 6 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.
मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 86 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी थेटच 58 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय.
#CoronavirusUpdates २८ मार्च, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/lbxGcafZgb
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 28, 2021
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123 आहे. त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर जाऊन पोहोचली आहे. तर 22 लाख 770 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे ४ हजार ४२६ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ४२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ५९ हजार ११२ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 28, 2021
नाशिकमधील कोरोना स्थिती –
नाशिकमध्येही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज 2 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक महापालिका श्रेत्रात 1 हजार 890, नाशिक ग्रामीणमध्ये 917, मालेगाव महापालिका हद्दीत 78 तर जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या 40 रुग्णाचा समावेश आहे. नाशिकमध्ये आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेडमधील कोरोना स्थिती –
नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 310 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 755 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नांदेडमध्ये आतापर्यंत 39 हजार 908 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 29 हजार 273 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झालेत. तर 731 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये सध्या 9 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?
40 thousand 414 people tested positive for corona in one day on Sunday, 108 died due to corona