Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना डोकं वर काढतोय! पुन्हा शाळा बंद होणार? शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा बंद ठेवण्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत बोलताना शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी शाळेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोना डोकं वर काढतोय! पुन्हा शाळा बंद होणार? शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलं स्पष्ट
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्रीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 4:21 PM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या (Corona Update) झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात राज्या 1 हजार 397 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक 889 रुग्ण एकट्या मुंबईत, 104 रुग्ण नवी मुंबईत, तसंच ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 15 जूनच्या आसपास राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. अशावेळी राज्यातील शाळा (School) पुन्हा बंद ठेवण्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत बोलताना शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शाळांना खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी शाळा पुन्हा बंद करणे योग्य नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क सक्ती नसली तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती व्हायला हवी, असं मत गायकवाड यांनी व्यक्त केलंय.

पाच राज्यांना केंद्र सरकारचा इशारा

केंद्र सरकारने कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या 5 राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

हे सुद्धा वाचा

शनिवारी महाराष्ट्रात 1357 नवे कोरोना रुग्ण

मुंबई – 889 नवी मुंबई – 104 ठाणे शहर – 91 ठाणे जिल्हा – 25 पुणे महापालिका क्षेत्र – 68 पुणे जिल्हा – 10

मुंबई महापालिका आरक्षण सोडतीवर गायकवाड यांची नाराजी

मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीबाबतही वर्षा गायकवाड यांनी भूमिका मांडली. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आम्ही नाराज आहोत. कारण विद्यमान नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांच्या जागेचं आरक्षण बदललं आहे. याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिलाय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.