महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आता RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आता RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक
Indian-Railway
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 8:23 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रवासाद्वारे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्याची RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलंय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेत चढताना, प्रवासात आणि आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यावर कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या 12 मे 2021 च्या ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीला RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर केलेला असेल. (Negative RT-PCR report mandatory for train passengers arriving in Maharashtra)

18 एप्रिल 2021 आणि 1 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्‍या प्रत्येकाला ते लागू असणार आहेत. राज्य सरकारने दिलेल्या नवीन सूचना http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे, तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने

कोरोना चाचणी करण्यासाठी RT-PCR किंवा रॅपिड एन्टिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं (National Environmental Engineering Research Institute) नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही. महत्वाची बाब म्हणजे निरीच्या या संशोधनाला ICMR ने ही मान्यता दिली आहे. कोरोना चाचणीच्या या पद्धतीमुळे वेळ आणि खर्चाचीही बचत होणार आहे.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान मोदींकडून 11 राज्यातील 60 जिल्हाधिकाऱ्यांसमोर अहमदनगरची दखल, वाचा हिवरेबाजारच्या कोरोनामुक्तीची यशोगाथा काय?

Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती

Negative RT-PCR report mandatory for train passengers arriving in Maharashtra

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.