मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्याही वाढतेय. पण आज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासादायक आहे. आज दिवसभरात 53 हजार 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 55 हजार 411 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 82.18 टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. (recovery rate of patients in the state increased, 55 thousand 411 people tested corona positive)
राज्यात सध्या 5 लाख 36 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नव्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. त्यातील 27 लाख 48 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त होऊल घरी परतले आहेत.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में #COVID19 के 55,411 नए मामले सामने आए हैं। 53,005 लोग डिस्चार्ज हए और 309 लोगों की मृत्यु दर्ज़ की गई।
कुल मामले: 33,43,951
कुल डिस्चार्ज: 27,48,153
कुल मृत्यु: 57,638
सक्रिय मामले: 5,36,682 pic.twitter.com/gaTHikW38m
— ANI_HindiNews (@AHindinews) April 10, 2021
मुंबईत गेल्या 24 तासांत 9 हजार 327 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 8 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या मात्र वाढली आहे. दिवसभरात 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमधील 30 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 34 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.
मुंबईत सध्या 91 हजार 108 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झालाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 34 दिवसांवर येऊन ठेपला आहे.
#CoronavirusUpdates
१० एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ९३२७
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ८४७४
बरे झालेले एकूण रुग्ण- ४,०६,०८७
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ७९%एकूण सक्रिय रुग्ण- ९१,१०८
दुप्पटीचा दर- ३४ दिवस
कोविड वाढीचा दर (३ एप्रिल-९ एप्रिल)- १.९७%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 10, 2021
पुणे शहरात आज दिवसभरात 4 हजार 953 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 389 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 50 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 22 हजार 982 वर जाऊन पोहोचलीय. त्यातील 2 लाख 66 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : शनिवार १० एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ५०,४७३
◆ नवे रुग्ण : ४,९५३ (३,२२,९८२)
◆ डिस्चार्ज : ४,३८९ (२,६६,८०९)
◆ चाचण्या : २५,५०४ (१६,९६,९४१)
◆ मृत्यू : ४६ (५,७००)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/faEqL62x1J— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 10, 2021
नागपूर जिल्ह्यात आज 5 हजार 131 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 831 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. आज नागपूर जिल्ह्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 51 हजार 576 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Maharashtra: Nagpur District reported 5131 new #COVID19 cases, 2837 recoveries and 65 deaths, in the last 24 hours, as per Civil Surgeon Nagpur.
Total cases: 2,71,355
Total recoveries: 2,14,073
Active cases: 51,576
Death toll: 5,706— ANI (@ANI) April 10, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?
recovery rate of patients in the state increased, 55 thousand 411 people tested corona positive