मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कठोर निर्बंधाची घोषणा आज करण्यात आलीय. त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आलीय. अशास्थितीत राज्याची चिंता वाढवणारी अजून एक बातमी आहे. राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 57 हजार 74 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 हजार 508 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात आज तब्बल 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (The number of corona patients in Maharashtra is alarming)
नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597 झाली आहे. त्यातील 25 लाख 22 हजार 823 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 55 हजार 878 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र में पिछले 24 घंटों में 57,074 नए कोविड मामले, 27,508 रिकवरी और 222 मौतें दर्ज़ की गई।
कुल मामले: 30,10,597
सक्रिय मामले: 4,30,503
कुल रिकवरी: 25,22,823
मृत्यु: 55,878 pic.twitter.com/1EtS9SUdSi— ANI_HindiNews (@AHindinews) April 4, 2021
मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. मुंबईत आज दिवसभरात 11 हजार 163 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 5 हजार 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरात 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 18 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 12 महिलांचा समावेश आहे.
मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे 82 टक्के आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचं प्रमाण 42 दिवसांवर येऊन ठेपलंय.
#CoronavirusUpdates
४ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/6KpGF6FyMC— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 4, 2021
पुण्यात आज दिवसभरात 6 हजार 225 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 3 हजार 762 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 11 मृत रुग्ण पुण्याबाहेरील होते. पुण्यात सध्या 21 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्या आकडेवारीसह पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 90 हजार 44 वर पोहोचलीय. त्यातील 2 लाख 42 हजार 652 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत 5 हजार 452 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
पुणे कोरोना अपडेट : रविवार ४ एप्रिल, २०२१
◆ उपचार सुरु : ४१,९४०
◆ नवे रुग्ण : ६,२२५ (२,९०,०४४)
◆ डिस्चार्ज : ३,७६२ (२,४२,६५२)
◆ चाचण्या : १७,७७४ (१५,५७,६२७)
◆ मृत्यू : ४१ (५,४५२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/l7i6nsaNNF— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 4, 2021
नागपुरात आज 4 हजार 110 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 497 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरात आज पुन्हा एकदा मृतांची संख्या 60 च्या वर पोहोचलीय. 62 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार 606 वर जाऊन पोहोचली आहे. तर 1 लाख 94 हजार 908 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 5 हजार 327 वर जाऊन पोहोचली आहे.
संबंधित बातम्या :
The number of corona patients in Maharashtra is alarming