Maharashtra covid 19 restrictions : निर्बंध उठवायला उशिर का झाला? दिल्लीच्या होकाराची वाट पाहिली?-आशिष शेलार

स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकी होऊ नये अशी रचना सरकारची होती. पण जनतेचा रेटा वाढला, विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून अखेर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.

Maharashtra covid 19 restrictions : निर्बंध उठवायला उशिर का झाला? दिल्लीच्या होकाराची वाट पाहिली?-आशिष शेलार
आशिष शेलार यांची सरकारवर सडकून टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 8:23 PM

मुंबई : राज्य सरकारने आज राज्यातील कोरोना निर्बंध पूर्णपणे (Unlock Maharashtra) उठवत असल्याची घोषणा केली. तसेच मास्क वापरणे हेही ऐच्छिक ठेवले. मात्र हे निर्बंध उठवायला एवढा उशीर का लागला? असाल सवाल आता भाजप नेते करत आहेत. हिंदू नववर्षा निमित्ताने गुढी पाडव्याला (Gudipadwa) निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकी होऊ नये अशी रचना सरकारची होती. पण जनतेचा रेटा वाढला, विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून अखेर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, विधानसभा सुरु असताना मी स्वत: याबाबत सभागृहात मागणी केली. त्यावेळी जाहीर केले नाही. त्यानंतर जनतेचा रेटा जेव्हा वाढू लागला तेव्हा रोष अंगावर येऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आज निर्णय घेतला, असा आरोप आता भाजपकडून करण्यात येतोय.

दिल्लीतून आदेश येण्याची वाट बघितली?

तसेच हा निर्णय घ्यायला एवढा उशिर का झाला? यापूर्वीच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय का घेतला नाही? गुढीपाडवा दोन दिवसावर आला असताना निर्णय का घेतला? याची परवानगी दिल्लीतून कुठल्या पक्ष कार्यालयातून येणार होती का? या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येईल की, हा निर्णय स्वखुशीने घेतलेला नाही. तर तो जनतेचा आणि विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून आज निर्णय घेण्यात आला, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले आहेत. त्यामुळे हा वाद नववर्षाच्या तोंडावरही संपताना दिसत नाही. भाजपबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारवर यावरूनच निशाणा साधला आहे. तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही सरकारवर टीका केली आहे.

हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे षडयंत्र

आशिष शेलार यांनी आरोप करतना, हिंदू नव वर्षे स्वागतयात्रा होऊ नये असेच प्रयत्न केले जात होते. मुंबईवर दहशतवादी हल्ले ड्रोनच्या माध्यमातून होणार अशी भिती घालून जमावबंदी लावण्यात आली होती. जर अशी पोलिसांकडे असेल तर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास कोणताही विरोध असण्याची कारण नाही. पण हिंदू सणांवर निर्बंध घालण्याचे षडयंत्र होते. आम्ही उघड केले त्यामुळे जनतेचा रेटा वाढला म्हणून निर्बंध उठवावे लागले, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मास्क बंदी उठवली तर तो निर्णय वैद्यकीय अभ्यास गटाच्या सुचनेनुसार होणे अपेक्षित आहे. या मास्क बंदी च्या नावाने नाक्या नाक्यावर जी बेहिशेबी वसूली सुरु होती त्याचे काय? असा सवालही त्यांनी केला.

TOP 9 Headlines | 31 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

Breaking News: कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! अनिल परब यांनी ठणकावलं, म्हणाले…

BMC : दीड महिन्यात 375 कि.मीची नालेसफाई कशी होणार? मुंबईकर वाऱ्यावर, सत्ताधारी फरार, शेलार प्रशासकाच्या भेटीला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.