कोणालाही पासवर्ड सांगू नका, 140 नंबर वादावर पोलिसांचं आवाहन

गेल्या काही दिवसांपासून 140 क्रमांकावरुन येणारा कॉल उचलू नये, अन्यथा तुमचे बँक खाते (Maharashtra cyber sale on fake calls) रिकामे होईल

कोणालाही पासवर्ड सांगू नका, 140 नंबर वादावर पोलिसांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jul 11, 2020 | 4:28 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 140 क्रमांकावरुन येणारा कॉल उचलू नये, अन्यथा तुमचे बँक खाते (Maharashtra cyber sale on fake calls) रिकामे होईल, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र यावर महाराष्ट्र सायबर विभागाने आज (11 जुलै) खुलासा केला (Maharashtra cyber sale on fake calls) आहे.

“जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात. परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास आणि ओटीपीसह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल, तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपीची माहिती दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी”, असं महाराष्ट्र सायबर सेलने सांगितले.

“140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रीसीव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन अकाउंट शून्य होते, असे जे संदेश समाज माध्यमावर फिरत आहेत. त्या संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही. जोपर्यंत आपण, बँक अकाऊंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डचे पूर्ण नंबर तसेच सी.व्ही.व्ही./ पिन नंबर कुणाला शेअर करीत नाही, तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कसलेही नुकसान होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे”, असंही महाराष्ट्र सायबर सेलेने सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

काय म्हटलं आहे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलीस माईकवर नागरिकांना आवाहन करत आहे की, “रहिवाशांना कळवण्यात येते की, मोबाईलवर 140 क्रमांकावरुन कॉल येत असेल तर कृपया करुन तो उचलू नये. जर कॉल उचलला तर तुमच्या बँकेतील अकाऊंटमधील बॅलेन्स झिरो टक्के होऊन जाईल. याची आपण काळजी घ्या.”

काय आहे सत्य ?

एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रिकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा या व्हिडीओमध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि चांगलाच गोंधळ उडाला. हा व्हिडीओ पाठवल्यानंतर पोलिसांनी ही अफवा असल्याची माहिती दिली. पण तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या :

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पदभरतीत फसवणूक, अध्यक्षांसह बँक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

Whatsapp वर नववर्षाच्या शुभेच्छा लिंक पाठवून फसवणूक, अनेकांना लुबाडलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.