आम्ही तुमच्या दु:खात सहभागी, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं महत्वाचं ट्विट
DCM Devendra Fadnavis on Raigad Khalapur Irshalwadi Landslide : मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्वाचं ट्विट
इर्शाळवाडी, रायगड| 20 जुलै 2023 : रायगडमध्ये अत्यंत दुदैवी घटना घडली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली आहे. 200 ते 250 लोकसंख्या असलेल्या या गावावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास डोंगर कोसळला. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 लोक या ढिगाऱ्या खाली अडकल्याची माहिती आहे. काही जणांना वाचवण्यात NDRF च्या टीमला यश आलं आहे. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. या संपूर्ण घटनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं ट्विट केलं आहे. सरकार इर्शाळवाडीतील लोकांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2023
तर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करत आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचावी यासाठी ते स्वतःला आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी बातचीत करत आहेत.
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचले असून तिथून खालापूरनजीक इरशाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.#इरशाळगड_दुर्घटना pic.twitter.com/5dxpHbiuun
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 20, 2023
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे फोनवरून माहिती घेत आहेत. दुर्घटनेनंतर खासदार सुनील तटकरे तातडीने रायगडकडे रवाना झाले आहेत. संसदेचे अधिवेशन सोडून सुनील तटकरे रायगडच्या दिशेने रवाना झालेत. जी लागेल ती मदत केली जाईल, रात्रीपासून मी सगळ्या घटनेचा आढावा घेत आहे, असं सुनील तटकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं आहे.