Lockdown Extension | मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही : राजेश टोपे

मुंबई रेड झोन असल्याने या ठिकाणी मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही," असे राजेश टोपेंनी (Rajesh Tope On Lockdown) सांगितले. 

Lockdown Extension | मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही : राजेश टोपे
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 8:13 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात (Rajesh Tope On Lockdown) आहे. मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलं आहे. मुंबईत रेड झोन आहे. त्यामुळे रेड झोनमधील लॉकडाऊन लगेच उठेल असे वाटत नाही. मात्र रेड झोनबाबतचा निर्णय हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित ठरवेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

“ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही नियम शिथील होतील. मात्र मुंबई रेड झोन असल्याने या ठिकाणी मुंबईतील लॉकडाऊन लवकर उठणार नाही,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

“मुंबई आजही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे रेड झोनचा लॉकडाऊन लगेच उठेल असे दिसत नाही. ऑरेंज झोनमध्ये कंटन्टेंमेट झोन आहे. ग्रीनमध्ये ते नाहीत. ऑरेंजमधील कंटेन्टेंमेट झोन वगळून इतर ठिकाणी दुकान सुरु करता येतील. रजिस्ट्रेशन, गाड्यांची खरेदी विक्री सुरु होती. त्यानिमित्ताने सरकारला आर्थिक स्त्रोत सुरु होईल,” असे राजेश टोपे म्हणाले.

“तसेच जे दुकान आहेत जी काही ठराविक वेळ सुरु करता येऊ शकतात. येत्या 18 मे नंतर ग्रीन आणि ऑरेंजमध्ये हे करता येऊ शकेल,” असेही राजेश टोपेंनी यावेळी म्हणाले.

“ग्रीन आणि ऑरेंज झोनला निश्चितच अनेक मोठ्या पद्धतीच्या सवलती 18 मे नंतर दिल्या जातील. ग्रीनमध्ये सीमा बंद करुन सर्व व्यवसाय सुरु केले जातील, असा माझा अंदाज आहे,” असे राजेश टोपे म्हणाले.

“ऑरेंज झोनमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत. त्या सुरु केल्या जातील. तसेच सर्व व्यवसायही तत्परतेने सुरु होतील. पण रेडमध्ये काय करायचं काय नाही हे केंद्र सरकारची सूचना येईल. पंतप्रधानांनी सर्वांना लॉकडाऊन कस उघडावं याच्या सूचना मागवल्या आहेत. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर अत्यंत महत्त्वाच्या बाबी सुरु करता येतील का हे मुख्यमंत्री स्तरावर ठरवलं जाईल,” असेही त्यांनी सांगितले.

“राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत  कोरोना रुग्णांची संख्या 75 हजारापर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसे काहीही नाही. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजार 738 इतका आहे. त्यामुळे जे अंदाज वर्तवले जात होते, तसे आपल्याकडे काही होईल असे वाटत नाही. आपल्याकडे लॉकडाऊनचा चांगला फायदा होत आहे.” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

महिनाभरात मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.