मुंबई : कोरोना लस न घेतलेल्या व्यक्तींना मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) प्रवासाची मुभा द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं (Maharashtra Government) लस न घेणाऱ्यांना प्रवेश न देण्याच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 08 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर 2021 आणि 8 जानेवारी व 09 जानेवारी आणि 31 जानेवारी 2022 रोजी निर्गमित केलेले आदेश राज्यात अदयाप लागू आहेत. त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
कोविड विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी 15 जुलै, 10ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेले निर्बंधाचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही 08 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर 2021, 8 जानेवारी व 9 जानेवारी दि. 31 जानेवारी 2022 या तारखांना निर्गमित केलेले आदेश अदयाप लागू आहेत. तरी नागरिकांनी व विविध सेवा देणाऱ्या संस्थांनी लसीकरण झाले व झाले नसले तरी सार्वजनिक प्रवास करताना मास्क घालने,सामाजिक अंतर पाळणे,हात वारंवार धुणे अशा कोविड प्रतिंबधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई हायकोर्टात कोरोना लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना मुंबई लोकलमधून प्रवास करु द्यावा, या मागणीसाठी याचिका करण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुंबई लोकलमधून प्रवास करायचा असल्यास कोरोना लस घेतलेली असणं आवश्यक असून त्याशिवाय प्रवास करता येणार नसल्याचं त्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं.
इतर बातम्या:
मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट
Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटकेपासून तूर्त दिलासा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश