महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी कायम, लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल आहे. (Maharashtra corona preventive vaccination)

महाराष्ट्राची लसीकरणात आघाडी कायम, लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 4:48 PM

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.(Maharashtra get first place in corona preventive vaccination with giving two dose)

18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण

दरम्यान, काल 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र अग्रेसर

राज्यामध्ये आतापर्यंत 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्येही महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याच बरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ 1 टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले आहे.

लवकरच मुंबईकरांना घरीच कोरोनाची लस

तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही त्रास न देता सहजपणे लस दिली जाऊ शकते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांना लवकर कोरोना लस देणे बंधनकारक आहे. हे लक्षात घेऊन मनोज कोटक यांनी बीएमसीकडे डोर टू डोर लस देण्याची मागणी केली होती.

त्यामुळे लवकरच मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात पालिका प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईकरांना राहत्या घरीच कोरोनाची लस मिळणार, पालिका लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा पुरवठा 10 दिवसांत सुरळीत होणार, वडेट्टीवारांचा दावा

(Maharashtra get first place in corona preventive vaccination with giving two dose)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.