कोकण, गोव्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज, कुठे कसं तापमान?, वाचा हवामान अंदाज

| Updated on: Nov 08, 2021 | 7:53 AM

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आणि उद्या (8 आणि 9 नोव्हेंबर) कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.

कोकण, गोव्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज, कुठे कसं तापमान?, वाचा हवामान अंदाज
संग्रहित छायाचित्र
Follow us on

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आणि उद्या (8 आणि 9 नोव्हेंबर) कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर आणखी वाढला असला तरी ते किनारपट्टीपासून दूर आहे. मात्र तरीही त्याचा परिणाम अद्याप कोकण किनाऱ्यावर होत असून, रविवारी संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण होते. याचा प्रभाव पुढील दोन दिवस कायम राहणार असून 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सध्या कुठे कसं तापमान?

काल (रविवारी) कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली.

मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, के एस होसाळीकर यांचं आवाहन

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होतंय मात्र ते किनारी भागापासून दूर जात आहे. याच घटनांचा परिणाम म्हणून 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी 80 ते 90 किमी राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी केलं आहे.

हे ही वाचा :

नगर आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, राऊत सरकारवर भडकले, म्हणतात, अश्रू ढाळू नका, ‘काय पावलं उचलणार ते सांगा’

जागेचं अधिग्रहणच नाही, तर कारवाई कसली करताय? औरंगाबादच्या सर्वात मोठ्या वादाचा Ground Report