सर्वात मोठी बातमी | मनोज जरागेंनी अर्धी लढाई जिंकली, सरकार ‘या’ तारखेला घेणार एकदिवसीय अधिवेशन

राज्यात आज ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात आले होते. मराठा आंदोलकांचं आंदोलन आणखी चिघळण्याआधीच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय अधिवेशनाची तारीख निश्चित केली आहे.

सर्वात मोठी बातमी | मनोज जरागेंनी अर्धी लढाई जिंकली, सरकार 'या' तारखेला घेणार एकदिवसीय अधिवेशन
CM EKNATH SHINDE AND MANOJ JARANGE PATIL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 7:51 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

10 फेब्रुवारीला उपोषणाला बसताना काय म्हणालेले?

मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार, अन्नपाणी काही घेणारच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त आलं होतं. त्यासोबतच त्यांचं पोटंही दुखू लागलं होतं. धाराशिव, परळी, हिंगोली, नगर,बारामती, लातूर, आळंदी आणि बीड, मनमाडसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी कडकडीत बंद ठेवत सरकारलाच अल्टिमेटम दिले होते. लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा दिला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.