वाहन चालवण्याचे लायसन्स आता ठरणार नाही, ‘माणसं मारण्याचं लायसन्स’, एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय

निष्काळजीपणे वाहने चालवण्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करावी, विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांवरही कडक कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

वाहन चालवण्याचे लायसन्स आता ठरणार नाही, 'माणसं मारण्याचं लायसन्स', एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 7:28 PM

मुंबई : निष्काळजीपणे आणि मद्यसेवन वाहने चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता सरकारने ठोस पाऊल उचललेली आहेत. विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाचे प्रधान सचिव, अपर पोलिस महासंचालक वाहतूक रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार अधिकारी यावेळी उपस्थित होते.

रस्त्यावर बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यूच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यामध्ये 9829 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

गृह विभागाने यासंदर्भात रस्त्यांवर निष्काळजीपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यामध्ये प्रवाशांचा होणारा मृत्यू त्यामुळे वाहनाचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

निष्काळजीपणे वाहने चालवण्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करावी, विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांवरही कडक कारवाई करावी अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपायोजनांचीही यावेळी माहिती दिली.

मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या उतारावरील अपघात टाळण्यासाठी सूचना फलकांसोबतच रंब्लर बसविणे यासारख्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देशही याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.