Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा देवेंद्रच… 5 डिसेंबरला ‘या’ ठिकाणी होणार नव्या सरकारचा शपथविधी; एकनाथ शिंदे, अजितदादांचं काय?

Maharashtra Government Formation 2024 : आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. यासाठी ठिकाणही निश्चित झाले आहे.  

राज्यात पुन्हा देवेंद्रच... 5 डिसेंबरला 'या' ठिकाणी होणार नव्या सरकारचा शपथविधी; एकनाथ शिंदे, अजितदादांचं काय?
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:14 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना मुख्यमंत्री कोण याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत आधी मुख्यमंत्रिपदावरुन आणि आता गृहमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याची तारीख निश्चित झाली आहे.

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख काय?

टीव्ही ९ मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील खास ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

शपथविधीपूर्वी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक

याच पार्श्वभूमीवर येत्या २ किंवा ३ डिसेंबर रोजी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडेल. महायुतीच्या नव्या सरकारचा मेगा शपथविधी सोहळा पार हा ५ डिसेंबरला पार पडेल. त्यापूर्वी २ किंवा ३ डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप आमदारांची बैठकही पार पडेल. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला.

आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा

यावेळी सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसेच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आले.

15 ते 16 हजार पासची व्यवस्था

त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल. महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष पासेसची सुविधा असणार आहे. यासाठी तब्बल  15 ते 16 हजार पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.