राज्यपालांना दोन चार पुस्तकं अभ्यासासाठी द्या, ठाकरे गटाच्या नेत्याने साधला निशाणा
भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सतत वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने काही संघटनांकडून त्यांना महाराष्ट्रातून हटवा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही कार्यक्रमाला गेले की, त्यांची वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर केली जाणारी सारवासारव हे आता महाराष्ट्राला आता नवं राहिलं नाही. राज्यपाल कोश्यारी कोणतरी वादग्रस्त विधान करतात, आणि त्या गोष्टीवरुन वादही उफाळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगला आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लक्ष्मण हाके यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना हटवा अशीच मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दोन-चार पुस्तके अभ्यासासाठी द्या अशीही मागण त्यांनी केली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सतत वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने काही संघटनांकडून त्यांना महाराष्ट्रातून हटवा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या वर टीका करताना म्हणाले की, या आधीही त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून जोरदार टीका केली जात आहे.
लक्ष्मण हाके यांनी भाजपवर आणि राज्यपाल या दोघांव जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या महाराष्ट्राचे तुम्ही राज्यपाल आहात त्या महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवतासमान मानते.
आणि अशा महान व्यक्तीविषयी तुम्ही वादग्रस्त विधान करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता राज्यातील जनता भाजपला आणि राज्यपालांना माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.