Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine: महाराष्ट्रात सुपरफास्ट लसीकरण; दिवसाला चार लाख लोकांना लस

महाराष्ट्राला आतापर्यंत लसीचे सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. | coronavirus vaccine

Corona Vaccine: महाराष्ट्रात सुपरफास्ट लसीकरण; दिवसाला चार लाख लोकांना लस
आतापर्यंत राज्यातील 82 लाख लोकांचे लसीकरण
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 3:22 PM

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्याच्या घडीला राज्यात दिवसाला तब्बल 4 लाख लोकांना लस (Covid vaccine) दिली जात आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. लसीकरणाचा हा वेग आणखी वाढू शकतो. त्यादृष्टीने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अधिकाअधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करु, असे सीताराम कुंटे यांनी सांगितले. (Covid 19 vaccination in Maharashtra)

कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक मंगळवारी पार पडली. त्यावेळी सीताराम कुंटे बोलत होते. आतापर्यंत राज्यातील 82 लाख लोकांचे लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्राला आतापर्यंत लसीचे सुमारे एक कोटी सहा लाख डोसेस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे टार्गेट

45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची महाराष्ट्राची राज्य सरासरी 12.3 टक्के असून भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरी पेक्षा अधिक लसीकरण केले आहे.

औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून येथे प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. राज्यातील लसीकरणाचा वेग पाहता केंद्र शासनाकडून जास्तीचा पुरवठा होण्याकरीता पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

(Covid 19 vaccination in Maharashtra)