धनंजय मुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. | Anil Deshmukh

धनंजय मुंडे प्रकरणात गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 1:19 PM

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना कायद्यापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसल्याचे सांगितले आहे. (NCP leader Anil Deshumkh on Dhananjay Munde case)

कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करु. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

मात्र, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा (FIR) कधी दाखल करणार, या प्रश्नाचे उत्तर देणे देशमुख यांनी टाळले. चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगत अनिल देशमुख यांनी काढता पाय घेतला.

धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याचीही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार

धनंजय मुंडे यांचे मोठे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी नोव्हेंबरमध्येच रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केल्याची माहिती आता समोर आली आहे.

पुरुषोत्तम केंद्रे हे धनंजय मुंडे यांचे मधवे मेहुणे आहेत. ते पुण्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. रेणू शर्मा या धनंजय मुंडे यांना अनेक वर्षापासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे डिप्रेशन मध्ये गेले होते. मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी मुंबईत रेणू शर्मा या महिलेविरोधात तक्रार दिली होती. नोव्हेंबर महिन्यात ही तक्रार देण्यात आली असली तरी पोलिसांनी मात्र अद्याप कारवाई केली नसल्याचं समोर आले आहे.

धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडे प्रकरणात भाजप नेत्यांमध्येच दोन तट पडलेत का?

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

धनंजय मुंडे प्रकरणात गेल्या 51 तासात काय घडले?, वाचा 14 मोठ्या घडामोडी…

सत्य समोर यायलाच हवे; समर्थकांचा सोशल मीडियातून DM ना सपोर्ट

(NCP leader Anil Deshumkh on Dhananjay Munde case)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.