Mumbai Slum Development | मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबईकरांच हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर

Mumbai Slum Development | मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:57 PM

मुंबई | स्वप्ननगरी, मायानगरी अशी अनेक विशेषणं मुंबईसाठी कमी पडतील. मुंबईत दररोज असंख्य जण हजारो स्वप्न उराशी घेऊन येतात. मुंबईत नोकरी मिळाल्यानंतर आपलं हक्काचं घर व्हावं, हे प्रत्येक सामन्य व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र अवाढव्य वाढलेल्या घरांच्या किमतींमुळे मुंबईकरांचं घरं घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. यामुळे अनेक मुंबईकर हे गेले कित्येक वर्ष झोपडीत राहतायेत. मुंबईच्या झोपडीत अनेक पिढी वाढल्या, मोठ्या झाल्या. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न मात्र काही पूर्ण झालं नाही. मात्र आता या घराबाबत राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

मुंबईकर झोपडीधारकांना अवघ्या 2 लाख 50 हजार रुपयांमध्ये घर मिळणार आहे. मुंबईकरांना झोपडीच्या बदल्यात सशुल्क हक्काचं घर मिळणार आहे. हक्काच्या घरासाठी मुंबईकरांना 2 लाख 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यात मुंबईकरांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक भार पडणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मुंबई नियमांनुसार आधी आपण 2 हजार या वर्षापर्यंतच्या झोपडीधारकांना मोफत घरं देत होतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कायदा केला. त्या कायद्यानुसार आम्ही 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांना पात्र ठरवलं. पण न्यायालयाच्या निर्णयानुसार 2000 ते 2011 या कालावधीतील झोपडीधारकांना घरं ही सशुल्क देता येत होतं, त्यांना मोफत देणं शक्य नव्हतं. त्याबाबतचे दर निश्चित करायचे होते. ते दर आता आम्ही ठरवले आहेत. आता फक्त अडीच लाख रुपयात घर देणार आहोत. यासाठी पीएमएवायचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे झोपडीधारकावर भार येणार नाही”, असं म्हणत फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच पीएमएवाय योजनमुळे आर्थिक बोजाही पडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.

मुंबईकरांना मोठा दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

गृहनिर्माण मंत्र्याना आव्हाडांची विनंती

आव्हाडांनी फडणवीस यांचं अभिनंदन करताना विनंतीही करणार असल्याचं म्हटलं. “मालकाला एकदा झोपडीचा एलवाय आला की अडीच वर्षात ती विकता आली पाहिजे”, अशा आशयाची मागणी आव्हाड फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. त्यामुळे आता  आव्हाडांनी ही विनंती केल्यानंतर फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे तमाम मुंबईकरांचं लक्ष असणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....