महाराष्ट्राच्या अस्मितेला कीड लावणारी बालमातांची आकडेवारी, सर्वाधिक बालविवाह होणाारे जिल्हे!

आरती औटी, सावित्रीबाईंसह अनेकांनी ज्या भूमीत अनिष्ट प्रथांचा भार झुगारला, त्याच महाराष्ट्रात हजारो मुली कोवळ्या वयात संसाराचा भार वाहतायत. महाराष्ट्रातील आकडेवारी पाहुन तुमचाही बसणार नाही विश्वास!

महाराष्ट्राच्या अस्मितेला कीड लावणारी बालमातांची आकडेवारी, सर्वाधिक बालविवाह होणाारे जिल्हे!
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 11:52 PM

मुंबई : काही वर्षांपूर्वी आलेली बालिकावधू सिरीयल गाजली होती. पण ती रिलवरची मालिका आणि महाराष्ट्राचं रिअल चित्र धक्कादायक आहे. सावित्रीबाईंसह अनेकांनी ज्या भूमीत अनिष्ट प्रथांचा भार झुगारला, त्याच महाराष्ट्रात हजारो मुली कोवळ्या वयात संसाराचा भार वाहतायत. महाराष्ट्रात गेल्या फक्त 1095 दिवसात 15 हजार 263 अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत. म्हणजे दिवसाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी 120 ते 125 अल्पवयीन मुली माता बनल्यात. ही आकडेवारी विधीमंडळात खुद्द महिला आणि बालविकासमंत्र्यांनीच दिलीये.

बालविवाह आणि त्यामुळे वाढलेल्या अल्पवयीन मातांची संख्या संपूर्ण जगाला लागलेली कीड आहे. युनिसेफच्या रिपोर्टनुसार जगात 65 कोटींपेक्षा जास्त स्त्रियांचा बालविवाह झालाय. यात भारतातल्या अर्ध्याहून अधिक बालवधू उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आहेत. भारतात एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या योजना केल्या जातायेत, मात्र दुसरीकडे खेळण्याच्या, जगण्याच्या वयात, मुली गरोदर बनतायत. याची गंभीरता समजून घेण्यासाठी काही आकडेवारी पाहूयात .त्याआधी बालविवाहाची व्याख्या समजून घेऊ. आपल्या देशात लग्नाच्या वेळी वधूचे वय 18 आणि वराचे 21 पेक्षा कमी असू नये, असं कायदा सांगतो, यालाच बालविवाह म्हणतात.

आता बालविवाह किती झाले ते पाहू. National Family Health Survey नुसार महाराष्ट्रात गेल्या 12 ते 13 वर्षात 2 कोटी बालविवाह झालेत. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात मराठवाडा अग्रेसर आहे. यामध्ये मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यात परभणी पहिल्या क्रमांकावर येतो.

सर्वाधिक बालविवाह होणारे जिल्हे

जिल्हा टक्केवारी

परभणी : 48 %

बीड : 43.7 %

धुळे : 40.5 %

सोलापूर : 40.3 %

हिंगोली : 37.1 %

नाशिक : 29.6 %

यातील गंभीर बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत केवळ 10 टक्के बालविवाह रोखण्यात राज्य सरकारला यश आलंय. गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहिली तर देशात महाराष्ट्र बालविवाहाच्या बाबतीत तीसऱ्या क्रमांकावर येतो.

राज्य बालविवाह किती?

उत्तर प्रदेश 3.6 कोटी पश्चिम बंगाल, बिहार 2.2 कोटी महाराष्ट्र 2 कोटी मध्य प्रदेश 1.6 कोटी

बालविवाह, बालमृत्यूसोबत इथे बाल गर्भपाताचाही विषय आहेच. विशीच्या आत गर्भधारणा करण्यात वाढ झालीय. चौथ्या व पाचव्‍या फॅमिली हेल्‍थ सर्वेक्षणानुसार 15 ते 19 वर्षे वयोगटातील मुलींच्‍या गर्भधारणेचे प्रमाण चिंता वाढविणारे आहे. नाशिक जिल्ह्यात चौथ्या सर्वेनुसार गर्भधारणेचे प्रमाण 8.3 टक्‍के होते, तर पाचव्‍या सर्वेमध्ये ते 14 टक्‍के नोंदविले गेले. वाशिममध्ये पाचव्‍या सर्वेक्षणानुसार गर्भधारणेचे प्रमाण 14.3 टक्‍के आहे. गर्भधारणेच्याबाबतीत नाशिकचा राज्‍यात दुसरा क्रमांक आहे. आता ही समोर आलेली आकडेवारी आहे, मात्र अशा किती केसेस असतील ज्या आतापर्यंत दडून असतील, वा दडून ठेवल्या असतील. देशात बालविवाहाच्या विरोधात कडक कायदा आहे, मात्र तरीही हे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

बालविवाह कायदा काय आहे?

बालविवाह कायदा, त्यात झालेले बदल

# 1929मध्ये प्रथम बालविवाह प्रतिबंधक कायदा

सन वयमर्यादा

1929 मुलीचे वय 14, मुलाचे वय 18

1955 मुलीचे वय 15 , मुलाचे 18

1978 मुलीचे वय 18, मुलाचे वय 21

2006 साली बालविवाह झालेल्या मुलांचे संरक्षण आणि गुन्हेगारांवर खटल्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवून बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 संमत

1929 मध्ये प्रथम बालविवाह प्रतिबंधक कायदा झाला. या कायद्याअंतर्गत मुलीचे वय 14 व मुलाचे वय 18 ठरवण्यात आले. त्यानंतर 1955 मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय 15 वर्षे तर मुलाचे 18 वर्षे करण्यात आले. बालविवाह कायद्यात 1978 मध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये मुलाचे लग्नाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलीचे लग्नाचे किमान वय 18 वर्षे ठेवण्यात आले होते. हा कायदा सर्व धर्मांना लागू करण्यात आला.

तत्पूर्वी वेगवेगळ्या धर्मांनुसार विवाहासाठी मुला-मुलींचे वय वेगवेगळे होते. आता या कायद्यांमध्ये बालविवाह रोखण्याची अथवा शिक्षेची तरतूद नव्हती, या सगळ्या कायद्यांमधला हा नकारात्मक मुद्दा होता… त्यामुळे त्यावर उपाय म्हणून 2006 साली बालविवाह प्रतिबंध कायदा संमत करण्यात आला. आधीचे कायदे रद्द करून बालविवाह रोखणे, बालविवाहात गुंतलेल्या मुलांचे संरक्षण आणि गुन्हेगारांवर खटला चालवणे अशी उदिष्ट या कायद्यासमोर ठेवण्यात आली.

महिला सबलीकरण, महिलांचे शिक्षण, महिलांच्या आरोग्याच्या दर्जात सुधारणा, बालमृत्यू, माता मृत्यूदराचे प्रमाण घटवण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा करण्यात आला आणि याच कायद्यानुसार बालविवाह हा अजामीनपात्र गुन्हा असून.. बालविवाहाची माहिती असणारी कोणीही व्यक्ती तो रोखू शकते. बालविवाह संबधित व्यक्तीला 2 वर्षे तुरुंगवास किंवा 1 लाख रुपये दंड होऊ शकतो.

आता बालविवाहामागची कारणे थोडक्यात समजून घेऊया. बालविवाह होण्यामागची कारणे निरक्षरता, शिक्षणाचा अभाव, गरीबी, शेतीप्रधान देशात मनुष्यबळाची गरज, मुघलांच्या आक्रमणामुळे महिलांची बिकट अवस्था, बालविवाहाला सुरुवात, लोकांच्या मनात रुजलेली परंपरा, जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी पालकांची घाई कोरोना, आर्थिक संकट

1.पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे निरक्षरता, शिक्षणाचा अभाव. त्यात स्त्री शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात.

2. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरीबी, जी लपता लपत नाही. तज्ञ सांगतात की, गरिबी हे बालविवाहाचं मुख्य कारण आहे. ग्रामीण भागात आजही लोकं एक वेळच्या जेवणाला महाग आहेत, त्यात कुटुंब सांभाळणे, अवघड. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भार हलका व्हावा, या दृष्टीने मग मुलगी असेल तर लगेच तिचं लग्न लाऊन दिलं जातं.

4. आपल्या शेतीप्रधान देशात बहुसंख्य लोक शेती करतात, शेती करताना मनुष्यबळाची मोठी गरज भासते, हे देखील बालविवाहाचे कारण ठरते, म्हणजे लग्न होऊन एक माणूस आपल्या घरात येणार आणि आपल्याला त्याची शेतीसाठी मदत होईल.

5. भारतात जेव्हा मुघलांचे आगमन झाले, तेव्हा स्त्रियांची अवस्था बिकट होत गेली. या दुष्ट लोकांच्या नजरेतून त्यांना वाचवण्यासाठी महिला आणि मुलींसाठी पर्दापद्धती आणि बालविवाह यांसारख्या प्रथा सुरू झाल्या.

7. आपला समाज कितीही पुढे गेला तरी काही लोकांच्या मनात चालत आलेल्या परंपरा घर करून बसल्यात. विशिष्ट जाती, धर्मात आजही लोक धार्मिक श्रद्धा आणि परंपरांना अधिक महत्त्व देतो, जे बालविवाहाच्या प्रचलित प्रथेचे सर्वात मोठे कारण आहे.

दुसरीकडे अनेक पालक आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी मुलांचे लवकरात लवकर लग्न लावून देतात. ज्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढते.

आता गेल्या 3 वर्षात बालविवाहाचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे कोरोना. कोरोनाने देशावर संकट ओढावले, मात्र एकीकडे काही बालविवाह कोरोनाच्या निर्बंधांमुळे थांबले तर दुसरीकडे कोरोनामुळे खालवलेली आर्थिक परिस्थिती बालविवाहांना कारणीभूत ठरली.

बालविवाहामुळे मानसिक विकास अवरुद्ध होतो.बालपण हिरावून घेतलं जातं.मुलींच्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. त्या लहान वयात गर्भवती होतात, ज्याने शारीरिक आणि मनोवैज्ञानिक समस्या उत्पन्न होतात. कुपोषण, अधिक कार्यभार, अशिक्षा, यौन व्यवहाराबद्दल अजाणता या सर्वांमुळे गर्भवती मुलींचा जीव धोक्यात येऊ शकतो.

त्या अपरिपक्व गर्भधारणा, लैंगिक संक्रमित रोग आणि एड्स सारख्या आजारांना बळी पडतात. तसेच यातील अधिक मुले कुपोषणाला बळी पडतात. त्यांचे वजन कमी असल्याचा भीती तसेच मृत्यूचा धोका जास्त आहे.तरुण वयात कुटुंबाची जबाबदारी मुलीवर येते त्यामुळे मानसिक आणि शारीरिक विकास थांबतो.

काही वेळा मुली बालविधवा होतात.अनेक घटना अशा असतात ज्यात, मुलं मोठी होऊन चांगला व्यवसाय किंवा नोकरी करतात. लहान वयात केलेल्या बायकोला सोडून ते नवीन लग्न करतात.अशा परिस्थितीत त्या मुलीला अडचणींचा सामना करावा लागतो. पाहायला गेलं तर बालविवाहामुळे लोकसंख्या वाढते मात्र त्या लोकसंख्या वाढीचे परिणाम देशाला व समाजाला भोगावे लागतात. मुख्य म्हणजे बालविवाहामुळे माता मृत्यू दर आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.

सरकार मुला-मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबत विचार करतेय, मात्र जे नियम कायदे करणार त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, नाहीतर ग्रामीण आणि शहरी अशा तराजूच्या दोन बाजू प्रगतीच्या मार्गावर अडथळा निर्माण करतील. एक मुलगी म्हणून आकडेवारी, हे विदारक वास्तव सांगताना दु:ख होतंय, कारण समाजात अजूनही यात या गोष्टी सुरू असून यावर आवाज उठवणारे कमी आहेत. एकदा विचार करा, समाज बदलण्यासाठी पुढे या, कारण आपणच आहोत, आपल्या जीवनाचे शिल्पकार.

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....