महाराष्ट्र पेटला नाही तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा टोला

हे उध्वस्त सेनेच्या लक्षात आलं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अनेक पक्षांची कुबडं घेऊन हा मोर्चा त्यांनी पार पाडला.

महाराष्ट्र पेटला नाही तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा टोला
शीतल म्हात्रे
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 9:15 PM

मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, खासदार संजय राऊत हे आता ज्योतिष्यपण झालेले आहेत. वेगवेगळ्या भूमिकेत ते शिरत असतात. त्यांना वेगवेगळे साक्षात्कार होत असतात. तसा फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार हा त्यांना झालेला साक्षात्कार आहे. दिवा विझतो तेव्हा त्याची शेवटची फडफड असते. तीच ही फडफड मोर्चाच्या रुपात दिसून आली. मुंबई महापालिका आपल्या हातातून जाते की, काय अशी भीती वाटते. मुंबईमध्ये उध्वस्त सेनेचा जीव आहे. मुंबई हातातून गेल्यास मुंबईतील उरलेसुरलेले लोकंही राहणार नाहीत. याची त्यांनी भीती आहे. म्हणून शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न होता.

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र पेटला. यावर प्रत्युत्तर देताना शीतल म्हात्रे यांनी सांगितलं की, महाराष्ट्र पेटलेला नाही. तुमची पेटलेली वात विझायला आली आहे. हे महाराष्ट्र बघतोय. निवडणुका आल्या की, महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. मुंबईचे तुकडे करायचे आहेत. असं सतत बोलत असतात. वसुली सरकारला सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर काहीही कामं राहिलेली नाहीत.

हा मोर्चा बेकारांना असलेलं काम आहे. स्वतःच्या जीवावर मोठा मोर्चा करू शकत नाही. हे उध्वस्त सेनेच्या लक्षात आलं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अनेक पक्षांची कुबडं घेऊन हा मोर्चा त्यांनी पार पाडला.

अंधारे ताई या मोर्च्यात का नव्हत्या. अंधारे ताई या संतांबद्दल बोलतात. राम, कृष्णाबद्दल बोलतात. हे हिंदूंचे देव तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. त्यांच्याबद्दल ब्र बोललं जात नाही. वि. दा. सावरकर हे महापुरुष नव्हते का. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं. मग, हा महापुरुषांचा अपमान नव्हे का, असा सवालही शीतल म्हात्रे यांनी विचारला.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....