बेळगाव, कारवार, निपाणी ते सोडतील तर मग, तसा विचार करता येईल…, शरद पवारांनी सीमावादावर भूमिकाच मांडली…
कर्नाटकचे नेते, मंत्री उठसूट महाराष्ट्राविषयी नको ती मागणी करतात, त्याला जबाबदार येथील सत्ताधारी आणि केंद्रात बसलेली लोकंही जबाबदार आहेत.
मु्ंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असतानाच बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनीही याबाबत ठोस भूमिका घेत त्यांनी सीमाभागातील या गावांसोबत आपण असल्याचा ठाम विश्वासही त्यांना देण्यात आला. या सीमावादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त करताना त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केली.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री बोमई सांगलीतील त्या गावांची मागणी करत असतील तर आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव, कारवार, निपाणी यासह सीमाभागातील काही गावांची आम्हीपण मागणी करत आहोत.
ते जर आमच्या मागणी प्रमाणे बेळगाव, कारवार आणि निपाणी हे सोडणार असतील तर त्या गावांविषयी चर्चा करुन प्रश्न सोडवता येईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरू आहे. त्यातच काल बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांची मागणी केल्यानंतर शरद पवारांनी एक दिवस उशीराच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी त्यांनी सांगितले की, कर्नाटकातील नेते, मंत्री सरळ उठतात आणि हवी तशी मागणी करतात. त्याला जबाबदार फक्त ते कर्नाटकातील नेते नाहीत तर त्याला येथील राज्यातील आणि केंद्रात सत्तेत असलेली लोकंही जबाबदार आहेत.
त्यामुळे त्यांनी चाळीस गावं मागण्याबद्दल काही मत नाही पण आमची गेल्या कित्येक वर्षांपासूनची जी मागणी आहे की, बेळगाव, कारवार, निपाणी ही गावं जर कर्नाटक सोडत असतील तर त्यांच्या कालच्या मागणीवर चर्चा करुन तोडगा काढता येईल असंही त्यांनी स्पष्ट केले.