प्रेयसीला भेटायला जायचं आहे, गाडीला कुठलं स्टिकर लावू? प्रियकराच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर
एका पठ्ठ्यानं मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन एक प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलंय.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना गाडीला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलंय. मुंबई पोलिसांनी यासाठी खास 3 रंगाचे स्टिकर सांगितले आहेत. त्यावरुन एका पठ्ठ्यानं मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन एक प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलंय. (Mumbai Police’s response to lover’s question on Twitter)
‘गर्लफ्रेन्डची आठवण येतेय’
गर्लफ्रेन्डची आठवण येतेय. तिला भेटायला जाण्यासाठी कुठले स्टिकर वापरु? असा प्रश्न एका तरुणाने मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन विचारला आहे. त्यावर मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलं आहे. तुमच्यासाठी भेट घेणं आवश्यक असलं तरी ते आमच्या अत्यावश्यक सेवेच्या यादीत येत नाही. हा दुरावा तुमच्यातील प्रेम वाढवेल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. तसंच हा फेज संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर सोबत असाल, अशा शुभेच्छाही मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला दिल्या आहेत.
We understand it’s essential for you sir but unfortunately it doesn’t fall under our essentials or emergency categories!
Distance makes the heart grow fonder & currently, you healthier
P.S. We wish you lifetime together. This is just a phase. #StayHomeStaySafe https://t.co/5221kRAmHp
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 22, 2021
मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल कोण सांभाळतं?
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना मुंबई पोलिसांकडूनही भन्नाट उत्तरं दिली जातात. त्याबाबत विनायक गायकवाड या व्यक्तीने मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल कोण सांभाळतं? असा प्रश्न विचारत त्यांच्या विनोदबुद्धीचं कौतुकही केलंय. त्यावरही मुंबई पोलिसांनी खास उत्तर देत प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
आपले शब्द देखील आमच्या चेहऱ्यावर तेवढंच हसू फुलवतात! या काळात आनंदाची ही देवाण-घेवाण अशीच सुरू ठेवूया.
काळजी घ्या, आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! https://t.co/FMIqmqzV46
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 22, 2021
मुंबई पोलिसांकडून 3 कलर कोड
“राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरु करत आहोत”, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी कलर कोड
मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. गाड्यांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, डॉक्टर अशाप्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे.
कलर कोड नेमका कशाप्रकारे?
वैद्यकीय कर्मचारी यांच्या गाड्यांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या गाडीसाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. मुंबई पोलिसांकडून लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. सीआरपीसी 144 अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown : राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या
Mumbai Police’s response to lover’s question on Twitter