Maharashtra Lockdown Sanchar Bandi : महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी लागू, अंतिम नियमावली जरुर पाहा

आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे. या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे.

Maharashtra Lockdown Sanchar Bandi : महाराष्ट्रात 15 दिवस संचारबंदी लागू, अंतिम नियमावली जरुर पाहा
लॉकडाऊन प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 6:49 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संचारबंदी आदेश लागू होतील. त्यामुळे अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केलीय. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. (All guidelines of curfew in Maharashtra What starts and what stays off)

आज रात्रीपासून लागू होणाऱ्या लॉकडाऊनची नियमावली जाणून घेणं गरजेचं आहे. या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे. एखाद्याने जाणूनबुजून या नियमांचं उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

‘ब्रेक द चेन’ची संपूर्ण नियमावली

1. राज्यात कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू होणार 2. कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही 3. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील 4. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत. 5. अपवादश्रेणीत असलेली सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत. 6. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत. 7. उपहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, फक्त होम डिलिव्हरी किंवा टेक-अवेसाठी परवानगी 8. मनोरंजन, दुकाने, मॉल ,शॉपिंग सेंटर इत्यादी सर्व सिनेमा हॉल बंद राहतील. 9. नाट्यग्रह तसेच थेटर पूर्णपणे बंद राहतील. 10. उद्याने, व्हिडीओ गेम, पार्लर बंद राहतील. 11. वॉटर पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद राहतील. 12. चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील. 13. आवश्यक सेवा न देणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर बंद राहतील. 14. समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. 15. धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील 16.नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधन केंद्रे / केश कार्तानालये बंद राहतील 17. शाळा, कॉलेज आणि खासगी शिकवणी बंद राहतील 18. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही 19. विवाह समारंभासाठी 25 लोकांना परवानगी 20. अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

?सार्वजनिक वाहतुकीसाठी निर्बंध काय?

?अटोरिक्षा = चालक अधिक २ प्रवासी

?टँक्सी (चारचाकी) = चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता

?बस = पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

➡️सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल

➡️चारचाकी टँक्सीमधे एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपये दंड केला जाईल. प्रत्येक खेपेनंतर वाहनं सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे

➡️भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

➡️सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.

➡️बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

➡️कोविडसुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष् करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.

➡️सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाने आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल. (All guidelines of curfew in Maharashtra What starts and what stays off))

?जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी मार्गदर्शक तत्त्व काय?

1. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविडसुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनीही दुकानाच्या परिसरात तसे वागायला हवे.

2. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यंनी लवकरात लवकर लशीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यायला हवी.

3. या नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडसंसुसंगत वागणूकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडविषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.

4. जीवनावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.

5. वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का? किंवा दुकानांमध्ये गर्दी होते आहे का? याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे.

6. खुल्या मैदानांच्या जागा मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजणे गरजेचे आहे ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरण्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल.

7. सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घ्यावे. तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown | पार्सल किंवा होम डिलिव्हरीला प्राधान्य, हॉटेल रेस्टॉरंटसाठी नवे नियम काय?

बसमध्ये उभ्या प्रवाशांना बंदी, रिक्षा-टॅक्सीसह इतर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम काय?

Maharashtra Lockdown: तुमची नोकरी-व्यवसाय जीवनावश्यक सेवांच्या यादीत येते का, पाहा ही संपूर्ण यादी

All guidelines of curfew in Maharashtra What starts and what stays off

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.