Photo : महाराष्ट्र संचारबंदी, मुंबईत कुठे रेल्वे स्थानकांवर गर्दी तर कुठे शुकशुकाट
VN |
Updated on: Apr 15, 2021 | 11:35 AM
राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. (Maharashtra Lockdown, Some Lockdown Pictures of Mumbai )
1 / 6
राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आज महाराष्ट्राच्या संचारबंदीचा पहिला दिवस आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी नियम पाळण्यात येत आहेत मात्र काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.
2 / 6
मुंबई, पुण्यासह इतर शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत काल दिवसभरात 9 हजार 925 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
3 / 6
मुंबईतील सीएसटी स्टेशन परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4 / 6
वाढती गर्दी लक्षात घेता स्टेशन परिसरात वारंवार सूचना केल्या जात आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमित करा, अशी सूचना केली आहे.
5 / 6
सिद्धिविनायक मंदिर परिसरात शांतता पाहायला मिळाली.
6 / 6
नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.