Lockdown: राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार

त्यानंतर लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. | Maharashtra Lockdown new rules

Lockdown: राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 3:13 PM

मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून अखेर आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल. (Thackeray govt new rules and regulations for Maharashtra Lockdown)

नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

नवे नियम काय असणार?

किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.

नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.

दादर स्टेशनवरील भाजी मार्केट हलवणार

मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन आणि वारंवार सूचना देऊनही मुंबईच्या दादर परिसरातील भाजी मार्केटमध्ये नागरिक रोज गर्दी करत असल्याने आता हे मार्केट स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत वारंवार सांगूनही लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा सर्वच शहरांमध्ये भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दी होते. गेल्यावर्षी दादर परिसराचा समावेश असलेला जी-साऊथ वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. तशी परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून आता पालिकेकडून दादर मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित बातम्या: 

Maharashtra Lockdown: मला लोकांना घाबरवयाचं नाही, पण इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता: डॉ. संजय ओक

Mumbai Coronavirus: लॉकडाऊन कठोर करण्याच्या हालचाली सुरु; दादर स्टेशनवरील भाजी मार्केट हलवणार

Tanmay Fadnavis | ‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

(Thackeray govt new rules and regulations for Maharashtra Lockdown)

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.